Bharat Ratna: माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह व डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

केंद्रसरकारने पुन्हा एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली

0
Bharat ratna
Bharat ratna

नगर : केंद्रसरकारने पुन्हा एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव (P. V. Narasimha Rao) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एमएस स्वामिनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवर तीन पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली.

नक्की वाचा : एकनाथ शिंदे सरकारी पैशाने गुंडांना पोसतात : संजय राऊत

नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद (Bharat Ratna)

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. “एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर पुढे आला. देशाला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली”, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याबद्दल काढलेत.

अवश्य वाचा : हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’ चित्रपटातील रॅप साँग प्रदर्शित

“चौधरी चरण सिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला भारतरत्न समर्पित (Bharat Ratna)

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “चौधरी चरण सिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार समर्पित करत आहोत. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांची समर्पण वृत्ती आणि आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी दाखविलेली तत्परता आम्हाला कायम प्रेरणा देत राहिल.”

“भारत सरकार डॉ. एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न प्रदान करत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एमएस स्वामीनाथन यांनी आपल्या राष्ट्रासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीच बदलली नाही तर देशाची अन्नसुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

हेही पहा : ठाकरे गटातील माजी नगरसेवकाची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here