Titeekshaa Tawde: अभिनेत्री तितीक्षा तावडे बांधणार दृष्यम-२ फेम अभिनेत्यासोबत लग्नगाठ

अभिनेत्री तितीक्षा ही अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच तितीक्षानं तिच्या केळवणाच्या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

0
Titeeksha Tawade
Titeeksha Tawade

नगर : मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तितीक्षा ही अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत (Siddharth Bodke) लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच तितीक्षानं तिच्या केळवणाच्या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नक्की वाचा : हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’ चित्रपटातील रॅप साँग प्रदर्शित

तितीक्षानं शेअर केला केळवणाचा फोटो (Titeekshaa Tawde)

तितीक्षानं सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, “त्यानं मला डेटसाठी विचारलं पण आम्ही केळवणाच्या कार्यक्रमासाठी गेलो.” तितीक्षानं शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हृता दुर्गुळे, ऐश्वर्या नारकर, रसिका सुनील या कलाकारांनी तितीक्षानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन सिद्धार्थ आणि तितीक्षाला  शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य वाचा : करण जोहरच्या लव्ह स्टोरीयाचा ट्रेलर प्रदर्शित   

तितीक्षानं ‘या’ मालिकांमध्ये केलं काम (Titeekshaa Tawde)

तितीक्षानं सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू अशी जवळी रहा,सरस्वती, असे हे कन्यादान, टोटल नादानिया या मालिकांमध्ये काम केलं आहे. तितीक्षाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. तिनं मनोरंजनसृष्टीत चांगली लोकप्रियता मिळवली आहे. तर दृष्यम-२ या चित्रपटामुळे सिद्धार्थ बोडकेला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच तू अशी जवळी रहा या मालिकेमध्ये या दोघांनीही सोबत काम केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here