पारनेर : पारनेर महाविद्यालयात (Parner College) भरलेल्या पुस्तक प्रदर्शन (Book Exhibition) व विक्री सेंटरला (Sales Center) पारनेरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थ्यांकडून ऐतिहासिक पुस्तकांना (Historical Books) चांगली मागणी असल्याचे दिसुन आले. पञकार दिनाचे औचित्य साधत पारनेर महाविद्यालय, पारनेर पञकार संघ व महाराष्ट्र साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात ५ व ६ जानेवारीला युवा साहित्य संमेलन (Youth Literature Conference) आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात पुस्तक विक्री सेंटर ठेवण्यात आले होते.
नक्की वाचा : भारत जोडो न्याय यात्रेचा लोगो काँग्रेसकडून जारी
जेष्ठ लेखक माजी सनदी अधिकारी विश्वासराव पाटील, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कौतिकराव ढाले, विद्यालयाचे प्राचार्य प्रा.लक्ष्मण मतकर, उपप्राचार्य आठरे पञकार संघाचे संस्थापक जेष्ठ पञकार संजय वाघमारे, माजी अध्यक्ष मार्तडराव बुचुडे,देविदास आबुज, शरद झावरे, विद्यमान अध्यक्ष उदय शेरकर, उपक्रम प्रमुख पञकार विनोद गोळे, शशिकांत भालेकर, संतोष सोबले, सुरेंद्र शिंदे, विशाल फटागडे, भगवान गायकवाड, प्रमोद गोळे,विद्यालय ग्रंथपाल भास्कर शेळके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झाले.
अवश्य वाचा : पत्नी व मुलाची हत्या करत गळफास घेऊन कुटुंब प्रमुखाची आत्महत्या
या ग्रंथप्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचे भव्य दर्जेदार पुस्तकांचा स्टाँल होता. तसेच ललित प्रकाशन अहमदनगर, साकेत प्रकाशन छञपती संभाजी नगर, छञपती सेवा प्रतिष्ठान नागपुर पुणे शाखा, आदींसह पुस्तक विक्रेत्यानी नामवंत प्रकाशकाची दर्जेदार पुस्तके या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवली होती. यासह पारनेर सार्वजनिक ग्रंथालय व पारनेर महाविद्यालयातील ग्रंथालय यांनी दुर्मिळ ग्रंथ या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पहाण्यासाठी ठेवले होते. पारनेरकरांनी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी केली. यावेळी विक्रेत्यांनी सांगितले की, ऐतिहासिक पुस्तकांना चांगली मागणी होती. त्याचबरोबर धार्मिक व नामवंत व्यक्तीच्या पुस्तकांनाही चांगली मागणी होती. पारनेरमध्ये पहिल्यांदा पुस्तक प्रदर्शन व विक्री होत असूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.