Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरात तीव्र आंदोलन 

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत दोन दिवसीय मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंचे आराध्य असलेल्या प्रभू रामचंद्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

0
Sangamner Strike

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात (Sahakar Maharishi Bhausaheb Thorat) यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या (Birth Centenary Festival) कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) उपस्थित राहिले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बस स्थानकासमोरील पुणे-नाशिक या मुख्य मार्गावर रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन (Strike) करण्यात आले. हे आंदोलन करत असताना अचानक त्यांनी कार्यक्रमाच्या दिशेने धाव घेतली. नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात (Custody) घेतले आहे.

नक्की वाचा : छापेमारी मागे थेट दिल्ली कनेक्शन : रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिर्डीत दोन दिवसीय मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंचे आराध्य असलेल्या प्रभू रामचंद्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आव्हाड यांना संगमनेरात येऊ द्यायचे नाही, असे हिंदुत्ववादी संघटनांनी ठरवून दुपारी साडेबाराच्या दरम्यान शहरातील बस स्थानकासमोर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या अटकेसाठी नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला होता.

अवश्य वाचा : नागा चैतन्य -साई पल्लवीच्या’थंडेल’चा टिझर प्रदर्शित  
 

जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्ताने आव्हाड संगमनेरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल (ता.८) सकाळपासूनच वेगवेगळ्या गटाने एकत्रित येत आव्हाड यांच्या उपस्थितीला विरोध करण्यास सुरुवात केली होती. बस स्थानकाजवळील रास्ता रोको आंदोलनादरम्यान आव्हाड यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली.

या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यक्रमस्थळासह आंदोलन होणाऱ्या ठिकाणी व शहरातील रहदारीच्या सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र आंदोलनकर्ते कार्यक्रमस्थळी पोहचण्या अगोदरच पोलिसांनी थांबवले. याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून आव्हाड यांच्या फोटोला काळी शाई फासून आंदोलन सुरू होते. मात्र आंदोलनाला वेगळं वळण लागू नये म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून नंतर सोडून देण्यात आले. या आंदोलनादरम्यान रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रंगासह बघ्यांचीही गर्दी झाल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन कार्यक्रमस्थळी कुणालाही जाऊ दिले नाही.

हा कार्यक्रम संपल्यानंतरआमदार जितेंद्र आव्हाड परत नाशिकच्या दिशेने जात असताना शहरातील पंचवटी हॉटेलसमोर व सायखिंडी फाट्यावर हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने अंडे, काळी शाई भरलेले फुगे फेकून तीव्र शब्दात घोषणाबाजी करून आव्हाडांचा विरोध केला. मात्र पोलिसांच्या संरक्षणात आव्हाडांच्या वाहनाला नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here