Tax : कर बुडव्यांच्या नावाचे चाैकाचाैकात फ्लेक्स झळकणार

Tax : कर बुडव्यांच्या नावाचे चाैकाचाैकात फ्लेक्स झळकणार

0
Tax : कर बुडव्यांच्या नावाचे चाैकाचाैकात फ्लेक्स झळकणार
Tax : कर बुडव्यांच्या नावाचे चाैकाचाैकात फ्लेक्स झळकणार

Tax : नगर : महापालिकेने शास्ती माफी (Penalty waived) देऊनही बड्या मालमत्ताधारकांनी कर (Tax) भरणाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. आजमितीला थकीत कर वसुलीसाठी शास्तीमाफी देऊनही केवळ साडेनऊ काेटी रुपयांची वसुली झाली आहे. महापालिकेकडून (AMC) कर बुडव्यांच्या नावाचे चाैकाचाैकात फ्लेक्स (Flex) लावण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डाॅ. पंकज जावळे (Dr. Pankaj Jawle) यांनी वसुली विभागाला दिले आहे.

हे देखील वाचा : ग्रंथ प्रदर्शनाला पारनेरकरांचा उदंड प्रतिसाद

  
महापालिकेने मालमत्ता धारकांना ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर ७५ टक्के शास्ती माफी जाहीर केली होती. दहा दिवसांत या योजनेचा ४४१३ जणांनी लाभ घेतला. थकबाकीपोटी महापालिकेकडे सहा कोटी ७० लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर शास्ती माफीच्या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ केली. उर्वरित २१ दिवसांत तीन कोटी १७ लाख २४ हजार, अशी एकूण ९ कोटी ८७ लाख ८४ हजार रुपयांची वसुली झाली आहे. अद्याप मालमत्ताधारकांकडे तब्बल २०३ कोटींची थकबाकी आहे. नगर शहरात एक लाखांपुढे थकबाकी असणाऱ्यांची तब्बल २७१२ इतकी संख्या आहे.  महापालिकेच्या मोठ्या मालमत्ता धारकांनी कर थकविला आहे. यात शिक्षण संस्था, हॉटेल व्यवसाय, कंपन्या, सरकारी कार्यालये यांनी थकवला आहे. एक कोटीच्या पुढे थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या २० इतकी आहे, अशा कर बुडव्यांची आता मालमत्ता जप्त करणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

नक्की वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरात तीव्र आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here