Budget : अंतरिम बजेट म्हणजे शेतकरी, गरिबांची फसवणूक; विराेधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका

Budget : अंतरिम बजेट म्हणजे शेतकरी, गरिबांची फसवणूक; विराेधी पक्षनेते वडेट्टीवार यांची टीका

0
Budget
Budget

Budget : नगर : केंद्र सरकारने (Central Govt) सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. हा अर्थसंकल्प (Budget) देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा आहे, टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.

नक्की वाचा: कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थसंकल्प (Budget)

वडेट्टीवार म्हणाले, ”अर्थसंकल्प करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केला. मागील नऊ वर्षात मोदी सरकारच्या योजना अपयशी ठरल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे अजून पूर्ण नाहीत. सामाजिक न्याय देणारे सरकार, असा डांगोरा केंद्र सरकार पिटत असले तरी ओबीसी, एसी, एसटी विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती मिळत नाही. एकीकडे सरकार दावा करते की २५ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेबाहेर काढले. दुसरीकडे आम्ही ८० कोटी जनतेला मोफत धान्य देतो. यातील विरोधाभास स्पष्ट आहे. म्हणजे देशात गरिबीची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेरोजगार युवक म्हणजे सक्षम युवक का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

Nirmala Sitaraman
Nirmala Sitaraman

हे देखील वाचा : आता कुणाचा बापही मराठा आरक्षण राेखू शकत नाही; छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा : आमदार संजय गायकवाड

पीक विम्याचा केवळ ४ कोटी शेतकऱ्यांना फायदा (Budget)

कापूस, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. पीक विम्याचा देशातील केवळ ४ कोटी शेतकऱ्यांना फायदा होतोय. पीक विम्याने शेतकऱ्यांचे भले होते की, पीक विमा कंपन्यांचे? राज्यात पीक विमा कंपन्यांचे भले करण्याऱ्या मंत्र्यांनी स्वतःची तिजोरी भरण्याचे काम केले आहे. हे महाराष्ट्रातील चित्र असेल तर देशात काय चित्र असेल? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here