Free electricity : सर्वसामान्यांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार ; अर्थसंकल्पात घोषणा

सर्वसामान्यांना आता ३०० युनिट वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. सीतारामन यांनी आज देशाचा अंतरीम अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विविध योजनांची घोषणा त्यांनी केली.

0
Nirmala Sitaraman
Nirmala Sitaraman

नगर : प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा (Pradhan Mantri Suryoday Yojana) लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळणार आहे. यामुळं लोकांना वीज बिलात मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वसामान्यांना आता ३०० युनिट वीज मोफत (300 units of electricity free) मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी केली. सीतारामन यांनी आज देशाचा अंतरीम अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विविध योजनांची घोषणा त्यांनी केली.

नक्की वाचा : कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल (Free electricity)

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्प २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत ज्यांच्या घरात सौर यंत्रणा बसवली आहे. त्यांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या योजनेची घोषणा केली होती. तसेच अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत.

अवश्य वाचा : ‘छत्रपती संभाजी’ उद्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होणार (Free electricity)

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, या योजनेमुळं भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. आमचे सरकार १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे. यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही, तर भारताला स्वयंभू बनवण्यास मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही पहा : तेजश्री प्रधानच्या ‘लोकशाही’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here