Chhatrapati Sambhaji :’छत्रपती संभाजी’ उद्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट उद्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.  

0
Chhatrapati Sambhaji
Chhatrapati Sambhaji

नगर : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. मराठा साम्राज्याच्या (Maratha Empire) विस्तार आणि संरक्षण करणाऱ्या याच पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट उद्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित (Realese) होत आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.  

नक्की वाचा : ‘आता वेळ झाली’ चित्रपटाची घोषणा ; दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत  

‘छत्रपती संभाजी’ महाराजांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर (Chhatrapati Sambhaji )

राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण,धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज रणांगणावरचे शेर होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती  संभाजी’ या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे. राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या जोरावर  छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले.’

अवश्य वाचा : तेजश्री प्रधानच्या ‘लोकशाही’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट  

राकेश सुबेसिंह दुलगज यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन (Chhatrapati Sambhaji )

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला.राकेश सुबेसिंह दुलगज यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख, कै.आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार ‘छत्रपती संभाजी’ हे महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

चित्रपटाला साजेशी ६ गाणी या चित्रपटात आहेत. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे तर पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. उद्या २ फ्रब्रुवारीला ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट  सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here