Crime : नगरसेवक नामदेव राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; राऊत यांच्याकडूनही तक्रार अर्ज दाखल

0
Crime

Crime : कर्जत: कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा (Crime) कर्जत पोलीस (Police) ठाण्यात दाखल करण्यात आला. कर्जत नगरपंचायतीच्या लेखाधिकारी नयना कुंभार यांनी तशी फिर्याद दिली आहे. तर नगरसेवक नामदेव राऊत यांनीही लेखाधिकारी नयना कुंभार यांच्या विरोधात अरेरावीची भाषा करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी तक्रार (complaint) पोलीस निरीक्षकांना दिलेल्या अर्जात केली आहे.

हे देखील वाचा : आता कुणाचा बापही मराठा आरक्षण राेखू शकत नाही; छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा : आमदार संजय गायकवाड

घटनेचे रेकॉर्डींग करु नये म्हणुन फोन हिसकावून घेत फोडला (Crime)


लेखाधिकारी नयना कुंभार यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी बुधवारी (ता.३१) दुपारी १ च्या सुमारास कर्जत नगरपंचायतीमध्ये कार्यरत असताना नामदेव राऊत त्या ठिकाणी आले. मी जे सांगेल तेच करायचे. कायदेशीर-बेकायदेशीर काही संबंध नाही. मी सांगेल तिच पूर्व दिशा असे म्हणाले, यावेळी आपण त्यांना म्हंटले की बेकायदेशीर कुठलीही बिले काढली जाणार नाहीत. राऊत यांना असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी मला शिवीगाळ, दमदाटी करीत मी करत असलेल्या सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच आपल्याला चापटाने मारहाण केली. कामकाज करीत असलेल्या टेबलपासुन मला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करताना त्यावेळी मी कोणाला फोन करु नये व घटनेचे रेकॉर्डींग करु नये म्हणुन फोन हिसकावून घेत फोडला. यावेळी कार्यालयात उपस्थित असणारे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी माझी सुटका केली.

नक्की वाचा: कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

अरेरावीची भाषा करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी (Crime)


नयना कुंभार या लेखा विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांना चुकीच्या पद्धतीने उत्तर दिले. त्याच पद्धतीने मला माहिती दिली असल्याचा चुकीचा उल्लेख केला असता याची विचारणा करण्यास त्यांच्याकडे गेलो. यावेळी लेखाधिकारी कुंभार यांनी तुम्ही मला विचारणारे कोण ? तुमचा संबंध काय येतो. मी या अगोदर ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे. त्याठिकाणी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहे. त्याच प्रकारचा गुन्हा तुमच्यावर सुद्धा दाखल करीन, अशी भाषा वापरत धमकी दिली. याआधी मी ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे. तेथे माझ्या नादी कोणी लागले नाही. त्यामुळे तुम्ही मला अशा पद्धतीची कुठलीही माहिती विचारायची नाही. तुमच्याकडे वेगळ्या प्रकारच्या भाषेत बघून घेईल, अशी धमकी कुंभार यांनी दिली असल्याचा तक्रार अर्ज पोलीस निरीक्षक कर्जत यांना राऊत यांनी दिला. संबंधित व्यक्तीच्या विरोधात अरेरावीची भाषा करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी तक्रार अर्जात केली आहे.

अवश्य वाचा : रूईछत्रपतीमध्ये आढळले बिबट्याची पिल्लं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here