OBC : कर्जत तालुका ओबीसी समाजाचा तहसीलवर मोर्चा

OBC : कर्जत तालुका ओबीसी समाजाचा तहसीलवर मोर्चा

0
OBC
OBC

OBC : कर्जत : मराठा समाजाच्या (Maratha society) दबावाला बळी पडून राज्य सरकारने (State Govt) घेतलेल्या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेल्या या निर्णयाला आमचा विरोध असून २६ जानेवारीचा अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्यात यावा. तसेच राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमुर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी. यासह चुकीच्या कार्य पध्दतीने व बेकायदेशीर रित्या वितरीत होणाऱ्या मराठा कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्रांचे वितरणाला स्थगिती द्यावी. राज्यातील ओबीसी (OBC), भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे या मागणीसाठी कर्जत ओबीसी समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

नक्की वाचा: कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

ओबीसी प्रवर्गातील आमचे मागासलेपण पिढ्यान पिढ्यापासून (OBC)


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्याचे नुकसान आमच्या आरक्षणास बसता कामा नये. आम्ही ओबीसी प्रवर्गातील विविध जातीचे घटक आहोत. ओबीसी प्रवर्गातील आमचे मागासलेपण पिढ्यान पिढ्यापासून आजपर्यंत कायम आहे. राज्यातील ओबीसी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचविणे ध्येय आहे. राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात “सगेसोयरे” या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब नुसार २६ जानेवारी रोजी मसुदा काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे.

हे देखील वाचा : आता कुणाचा बापही मराठा आरक्षण राेखू शकत नाही; छगन भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा : आमदार संजय गायकवाड

ओबीसीवर अन्याय होणार याची शाश्वती राज्य शासनाने देण्याची मागणी (OBC)

त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे. त्या संदर्भात आमच्या काही हरकती असून ते ओबीसी समाजाला मान्य नाहीत, याच पार्श्वभूमीवर कर्जत ओबीसी समाजाचा कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेविका मनीषा सोनमाळी, विनोद दळवी, डॉ गोरे, सुमित राऊत आणि नामदेव थोरात यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत ओबीसी समाजावर अन्याय होणार याची शाश्वती प्रशासनाने आणि राज्य शासनाने द्यावी अशी मागणी केली. या आशयाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here