Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार; गृहमंत्री अमित शहांची घोषणा

Amit Shah On CAA : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

0
Amit Shah On CAA
Amit Shah On CAA

नगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने या कायद्याला मंजुरी दिली होती. “नागरिकत्व सुधारणा कायदा’ हा देशाचा कायदा असून याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे. अमित शहांनी दिल्लीतील ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये ही घोषणा केली आहे.

नक्की वाचा : माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न : मनोज जरांगे  

CAA कायदा लागू झाल्यानंतर कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही (Amit Shah On CAA)

देशाची फाळणी झाली तेव्हा देशातील अल्पसंख्याकावर अत्याचार झाले. तेव्हा काँग्रेसने निर्वासितांचे भारतात स्वागत केले आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल असं आश्वासन दिलं होतं. परंतु ते आता मागे हटत आहेत”, अशी टीका यावेळी अमित शहांनी केली. तसंच,“हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही” कारण त्याबाबत तशी तरतूद करण्यात आलेली नाही. सीएए हा बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे”,असं शाह म्हणाले.

अवश्य वाचा : इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा

डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने सीएए कायदा मंजूर (Amit Shah On CAA)

३१ डिसेंबर २०१४ च्या आधी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देणे या कायद्याचे उद्दीष्ट आहे”,असंही शाह म्हणाले. डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने सीएए कायदा मंजूर केला. त्यानंतर देशभरात या कायद्याविरोधात निषेध नोंदवला गेला. हा कायदा रद्द व्हावा, याकरता निदर्शने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here