Aata Vel Zaali Trailer: ‘आता वेळ झाली’ चा भावनिक ट्रेलर प्रदर्शित

अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

0
Ata vel zali Trailer
Ata vel zali Trailer

नगर : मराठी चित्रपटसृष्टीत आता प्रत्येकाला भावनिक करणारा विषय घेऊन अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या ‘आता वेळ झाली’ (Aata Vel Zaali) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

नक्की वाचा : हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’ चित्रपटातील रॅप साँग प्रदर्शित

‘आता वेळ झाली’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दिलीप प्रभावळकर हे शशिधर लेले या ७० वर्षांच्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहेत. तर रोहिणी हट्टंगडी या रंजना लेले यांच्या भूमिकेत दिसत आहेत. शशिधर लेले हे राष्ट्रपतींकडे एक मागणी करतात. ती मागणी अशी असते की, रंजना लेले आणि शशिधर यांना मृत्यूदंड मिळावा.

ट्रेलरमधील डायलॉगने वेधलं प्रेक्षकांचे लक्ष (Aata Vel Zaali Trailer)

“तुम्ही गीता वाचली नाहीये का? कृष्णानं जेव्हा ठरवलं की त्याच्या मृत्यूची वेळ आली आहे. तेव्हा त्याने अरण्यात जाऊन स्वतःची शिकार करून घेतली.” हा शशिधर लेले यांचा डायलॉग देखील ट्रेलरमध्ये ऐकू येतो. सोशल मीडियावर ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला कॅप्शन देण्यात आलं, “आपण सन्मानाने का मरू शकत नाही?” सोशल मीडियावर अनेक जण या ट्रेलरचं कौतुक करत आहेत.

अवश्य वाचा : विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करणारा विकृत शिक्षक तुरुंगात

कधी रिलीज होणार चित्रपट ? (Aata Vel Zaali Trailer)

भाग्यश्री लिमये, शिवराज वायचळ, जयवंत वाडकर, भरत दाभोळकर आणि अभिनव पाटेकर, गुरु ठाकूर हे कलाकार देखील ‘आता वेळ झाली’ या चित्रपटात काम करणार आहेत. हा चित्रपट २३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here