Chhagan Bhujbal : आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते : छगन भुजबळ

0
Chhagan Bhujbal : आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : संगमनेर : ओबीसींचे आरक्षण (OBC reservation) वाचवले पाहिजे, याबद्दल जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आतापर्यंत एकही शब्द काढला नाही. एखादा शब्द बोलण्याची त्यांची हिंमतही झालेली नाही. आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.

हे देखील वाचा : रेल्वे विभागाचा निर्णय; तिकीट बुकिंग ते ट्रेन ट्रॅकिंग आता एकाच अ‍ॅपवर


बुधवारी (ता.३) संगमनेर शहरातील जय जवान चौकात सकल ओबीसी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, या अनुषंगाने भुजबळ संगमनेरमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेला प्रश्नावर भुजबळ म्हणाले, 35 वर्षे मी ओबीसीचे काम करतो आहे. आव्हाड यांना मंत्रिमंडळामध्ये घ्या, हे सांगण्यासाठी शरद पवार यांच्याकडे शिफारस केली होती. मात्र, आता आव्हाड ओबीसीबद्दल एक शब्दही बोलत नाही. जो बोलतोय त्याच्याविरुद्ध तुम्ही बोलताय. तुम्ही त्या मानाने खूप लहान आहात. तुम्ही तुमचे काम करा एवढे दिशाहीन होण्याची काही गरज नाही. अशीही टीका मंत्री भुजबळ यांनी आव्हाड यांच्यावर केली.

नक्की वाचा : पैशांसाठी नातंही विसरला; बहिणीच्या घरात भावानेच केली लाखाे रुपयांची घरफोडी


नायगाव येथे बुधवारी आम्ही सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकांनी दुधाने अभिषेक करून पुतळ्याचे शुद्धीकरण केले. त्या स्पृश्य अस्पृश्य भेदभाव करणाऱ्यांना महात्मा फुले यांचे विचार समजलेच नाही आणि विशेष म्हणजे ते ज्या पक्षात काम करतात त्या पक्षात स्पृश्य अस्पृश्य भेदभाव होत असेल तर त्यांचे पुढे काय होईल? असे सडेतोड उत्तर देखील मंत्री भुजबळ यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here