Mock Drill : विद्यार्थ्यांकडून रस्ते अपघात व सुरक्षा आपत्तीचे ‘माॅक ड्रिल’

Mock Drill : संगमनेर शहरातून जाणा-या महामार्गावर अपघात झाल्यास प्राथमिक उपचार व मदतीची जाणीव निर्माण होण्यासाठी श्रीमती ललितादेवी मालपाणी शिक्षणशास्त्र महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी रस्ते अपघाताचे पथनाट्य व माॅक ड्रिलचे सादरीकरण केले.

0
Mock Drill

Mock Drill : संगमनेर : संगमनेर शहरातून (Sangamner City) जाणा-या महामार्गावर अपघात (Accident) झाल्यास प्राथमिक उपचार व मदतीची जाणीव निर्माण होण्यासाठी श्रीमती ललितादेवी मालपाणी शिक्षणशास्त्र महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी रस्ते अपघाताचे पथनाट्य (Street drama of road accident) व माॅक ड्रिलचे सादरीकरण करून प्रत्यक्ष रस्ते अपघाताचा अनुभव दिला. या माॅक ड्रिलमुळे न झालेल्या अपघाताची चर्चा संगमनेर महाविद्यालय (Sangamner College) परिसरात रंगली होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ.भालचंद्र भावे, समाजसेवा विभागाचे समन्वयक प्रा.राजु शेख, वृत्तपत्र विभागाचे प्रा.सुशांत सातपुते उपस्थित होते.

नक्की वाचा : रेल्वे विभागाचा निर्णय; तिकीट बुकिंग ते ट्रेन ट्रॅकिंग आता एकाच अ‍ॅपवर

नैसर्गिक व मानवी आपत्तीमुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यु होत असताना पथनाट्य सादरीकरणातून श्रमशक्ती ज्युनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी रस्ते अपघात व सुरक्षा या विषयावर अपघातांच्या कारणांचे प्रदर्शन केले. तर मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या त्यांनी अधोरेखित केली. रस्ते अपघातात ताबडतोब उपचार होण्यासाठी रुग्णवाहिका,पोलिस स्टेशन व हाॅस्पिटलची माहिती कशी महत्वाची आहे, याची जनजागृती करून प्रत्यक्ष दोन विद्यार्थ्यांचा वाहन अपघाताचा देखावा करून रुग्णवाहिकेला दूरध्वनीद्वारे मदतीसाठी पाचारण केले.

अवश्य वाचा : जितेंद्र आव्हाडांना अटक करा : राम कदम

माॅक ड्रिलसाठी आलेल्या रूग्णवाहिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे न झालेल्या अपघाताची चर्चा संगगमनेर महाविद्यालय परिसरात सूरू झाली. मात्र यातून रस्ते अपघात, सुरक्षा व उपचार किती महत्वाचे आहे याची जाणीव उपस्थितांना झाली.अपघातग्रस्तांना ताबडतोब उपचार मिळाल्यास रस्त्यावर होणारे मृत्युचे प्रमाण कमी होते हा संदेश विद्यार्थांनी दिला. याप्रसंगी परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. नयना पंजे, विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. विलास पांढरे, प्रा. ज्योती मेस्त्री, प्रा. मंगल आरोटे, प्रा. कविता काटे, प्रा. योगिता वाकचौरे यासह मोठ्या संख्येने शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here