Jitendra Awhad : ‘मी स्वतः त्यांचा वध करणार’; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर

Jitendra Awhad : 'मी स्वतः त्यांचा वध करणार'; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर

0
Jitendra Awhad : 'मी स्वतः त्यांचा वध करणार'; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर
Jitendra Awhad : 'मी स्वतः त्यांचा वध करणार'; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर

Jitendra Awhad : नगर : श्रीराम मांसाहारी हाेते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्याने देशभर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. संत महात्मांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अयोध्या येथील जगद्गुरू परमहंस आचार्य महाराज (Jagadguru Paramhans Acharya Maharaj) प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आपण स्वंय जितेंद्र आव्हाड यांचा वध करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरु आहे.

हे देखील वाचा : आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते : छगन भुजबळ

आचार्य महाराज म्हणाले, ” सरकारने जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी. सरकार कारवाई करणार नसेल तर “मैं स्वयं उसको मार डालूंगा, हमे चाहे फासी होने दो, संत समाज डरता नही है, इस तरह से अकबर के भक्तो को खुश करने की कोशिश की जा रही है,” असे त्यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांना संत समाज माफ करणार नाही.” नगर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रभू रामचंद्रांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला.

नक्की वाचा : पैशांसाठी नातंही विसरला; बहिणीच्या घरात भावानेच केली लाखाे रुपयांची घरफोडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here