Shivrayancha Chhava :’शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीज ;एकदा पहाच!

नगर : "शिवरायांचा छावा या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

0
Shivrayancha Chhava

नगर : “शिवरायांचा छावा”(Shivrayancha Chhava) या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट बघत आहेत. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर(Digpal Lanjekar) यांच्या या चित्रपटाचा टीझर रिलीज (Teaser release) झाला आहे.

नक्की वाचा : विद्यार्थ्यांकडून रस्ते अपघात व सुरक्षा आपत्तीचे ‘माॅक ड्रिल’

शिवरायांचा छावा या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका नेमके कोण साकारणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र हा टिझर पाहिल्यावर प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर “शिवरायांचा छावा” या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अभिनेता भूषण पाटील (Bhushan Patil) हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे.

अवश्य वाचा : जितेंद्र आव्हाडांना अटक करा : राम कदम

“शिवरायांचा छावा” या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला घनदाट जंगल दिसते. त्यानंतर एक वाघ दिसतो. त्या वाघाच्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा अभिनेता भूषण पाटील उभा असल्याचे दिसतं आहे. त्यातच भूषण हा वाघाची शेपूट धरुन त्याला फरफटत घेऊन जातो, असं दिसत आहे. या टीझरला दिग्पाल लांजेकर यांनी कॅप्शन दिलं, “कोण शत्रू यावरी करील कैसा कावा, वाघालाही फाडतो हा “शिवरायांचा छावा”.छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण पाटील याला पाहिल्यावर प्रेक्षकांनी या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

“शिवरायांचा छावा” या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला संभाजी महाराजांचा संघर्ष रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ या दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता त्यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here