Eknath Khadse : विकासावर बोलायची वेळ येते तेव्हा त्यांना प्रभू श्रीराम आठवतात – एकनाथ खडसे

Eknath Khadse : विकासावर बोलायची वेळ येते तेव्हा त्यांना प्रभू श्रीराम आठवतात - एकनाथ खडसे

0
Eknath Khadse : विकासावर बोलायची वेळ येते तेव्हा त्यांना प्रभू श्रीराम आठवतात - एकनाथ खडसे
Eknath Khadse : विकासावर बोलायची वेळ येते तेव्हा त्यांना प्रभू श्रीराम आठवतात - एकनाथ खडसे

Eknath Khadse : नगर : देशात महागाई वाढलेली आहे. चुकीच्या आर्थिक नीतीमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. बेरोजगारी वाढली आहे. महिला असुरक्षित आहेत. देशात केलेल्या विकासावर बोलायची वेळ येते तेव्हा त्यांना प्रभू श्रीराम (Shri Ram) आठवतात. मी ४० वर्षे त्यांच्या बरोबरच राहिलेलो आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व क्लृप्त्या मी जाणून आहे, अशी टीकेची तोफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) विधानपरिषदेतील आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी डागली.

हे देखील वाचा : आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, याचे वाईट वाटते : छगन भुजबळ

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर सुरू आहे. या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, प्राजक्त तनपुरे आदींसह पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : ‘मी स्वतः त्यांचा वध करणार’; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर

एकनाथ खडसे म्हणाले, भाषणे करून सरकार येत नाही. भाषणांमुळे वातावरण निर्मिती होते. २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापणा झाल्यावर २८ ते ३० जानेवारीच्या दरम्यान लोकसभेची आचारसंहिता लागू शकते. निवडणुका वाऱ्यावर जिंकता येत नाही. राज्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग व देशात भाजप विरोधात वातावरण असूनही उपयोग नाही. पक्ष संघटन महत्त्वाचे असते. पक्ष संघटनेवर निवडणूक जिंकली जाते. गावोगाव बुथ रचना झाल्यास सत्ता मिळू शकते. कार्यकर्त्याने कोणत्याही आदेशाची वाट न पाहता काम केले पाहिजे. कार्यकर्ता सेल्फ स्टार्टर हवा. चाय पे चर्चा होते मग, दूध-भाजीपाला दर, महागाई, भ्रष्टाचार, जीवनावश्यक गोष्टींचे दर यावर चर्चा का होऊ शकत नाही. अशा चर्चा घडवून आणा. केंद्रीय तपास यंत्रणेला घाबरणारे कार्यकर्ते सक्रीय राहणार नाहीत, असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

सोशल मीडिया मोठे शस्त्र

सोशल मीडिया हे आगामी काळातील महत्त्वाचे शस्त्र आहे. याचा उपयोग नेते व कार्यकर्त्यांनी करून भाजपच्या चुकीच्या प्रचाराला विरोध करावा. जनतेचे प्रश्न मांडून जनजागृती करावी. राज्यातील शेतकरी निवडणुकीची वाट पाहत आहेत, असा इशारा त्यांनी दिला.

मराठा आंदोलन त्यांच्यामुळे

मराठा समाज जमा होतो ते एका दिवसात झाले नाही. त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. गिरीश महाजनांनी सग्यासोयऱ्यांसकट आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे ते आरक्षण मागत आहेत. आता ते जाती-जातीत भांडणे लावून देत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी पहिल्यापासून शरद पवार यांनी केलेली आहे. राज्यातील मराठा आरक्षणासाठी आंदोलने फडणवीस यांच्या आश्वासनामुळे होत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

जितेंद्र आव्हाडांचे टोचले कान

श्रीरामाविषयीचे जितेंद्र आव्हाड यांचे मत वैयक्तिक आहे. त्याच्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. जितेंद्र आव्हाडांना मी वडीलकीच्या नात्याने सांगतो की, ज्या ठिकाणी भावनांचे विषय असतात तिथे हात घालू नये. मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारू नये. निवडणुका जवळ असताना वादग्रस्त विधान करण्यात शक्ती खर्च करू नये. महागाई, शेतमालाला भाव हे विषय मांडण्यावर ताकद लावा, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here