Savitribai Phule: सावित्रीबाई फुलेंचे जीवनकार्य प्रेरणादायी : प्रा.कल्याणी साळुंके

Savitribai Phule : क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन समाजकार्य केले. त्यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक कल्याणी साळुंके यांनी केले.

0
Savitribai Phule

Savitribai Phule: श्रीरामपूर : क्रांतीज्योती साविञीबाई फुले (Krantijyoti Savijnibai Phule) यांनी अनेक अडचणींवर मात करुन समाजकार्य केले. विरोधाला न जुमानता त्यांनी महिलांसाठी शैक्षणिक क्रांती (Educational revolution) घडविली. त्यांचे जीवनकार्य (Life Work) प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक कल्याणी साळुंके (Professor Kalyani Salunke) यांनी केले.

नक्की वाचा : ‘मी स्वतः त्यांचा वध करणार’; जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर परमहंस आचार्य महाराजांचा संताप अनावर

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांचे जयंतीदिनी ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेहोते. याप्रसंगी प्राध्यापक कल्याणी साळुंके ‘साविञीबाईंचे जीवनकार्य’ या विषयावर बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनिता गायकवाड होत्या. प्राध्यापक साळुंके यांनी सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन करताना सविस्तर विवेचन केले.

अवश्य वाचा : विद्यार्थ्यांकडून रस्ते अपघात व सुरक्षा आपत्तीचे ‘माॅक ड्रिल’

अध्यक्षपदावरुन बोलताना डॉ.गायकवाड यांनी साविञीबाई फुले यांचे जीवनचरित्र वाचण्याचे आणि त्यापासून प्रेरणा घेवून अनुकरण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाच्या समन्वयक प्रा.संगीता खंडीझोड यांनी केले. या कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.अमृता गायके यांनी केले तर प्रा. पायल सुराणा यांनी आभार मानले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here