Chhatrapati Shivaji Maharaj : नगर जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखविले जाणार : जिल्हाधिकारी सालीमठ

Chhatrapati Shivaji Maharaj : नगर जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखविले जाणार : जिल्हाधिकारी सालीमठ

0
Chhatrapati Shivaji Maharaj : नगर जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखविले जाणार : जिल्हाधिकारी सालीमठ
Chhatrapati Shivaji Maharaj : नगर जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखविले जाणार : जिल्हाधिकारी सालीमठ

Chhatrapati Shivaji Maharaj : नगर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार जनमानसांपर्यंत पोहचविण्यासाठी तीन दिवशीय महानाट्य कार्यक्रमांचे आयोजन (Organizing events) नगर जिल्हयात लवकरच करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयाेजनाचे सुयाेग्य नियाेजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

नक्की वाचा : GST : शेतकऱ्यांना जीएसटीचा जाच !

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या संदर्भात प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ आदी उपस्थित हाेते. 

अवश्य वाचा : नेवासा तहसीलवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

जिल्हाधिकारी म्हणाले, ”आपल्या कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन व स्वातंत्र्य लढ्यातील वीरांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे विचार जनमानसांपर्यंत पोहचविण्यासाठी तीन दिवशीय महानाट्य कार्यक्रमांचे आयोजन नगर जिल्ह्यात लवकरच करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात २ जून २०२३ ते ६ जून २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, या उद्देशाने विविध कार्यक्रम राज्यभरात आयोजिले जात आहेत. नगर जिल्ह्यातही लवकरच महासंस्कृती महोत्सव व महानाट्य कार्यक्रम आयोजनासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक आयोजित करुन कार्यक्रमाचे स्थळ व दिनांक निश्चित करण्यात येईल. या कार्यक्रांसंदर्भात संबंधित विभागांनी पूर्व तयारी व नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.” 

या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवात राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम,  शिवचरित्रावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील पोवाडा, भारुड, गोंधळगीत आदी विविध प्रकाराचा समावेश असणार आहे. स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम, कविता, व्याख्याने, देश भक्तिगीतांचा कार्यक्रमांचा या महोत्सवात समावेश करण्यात यावा. तसेच या महोत्सवात प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती, वन संस्कृती दालन, हस्तकला वस्तू दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटन विषयक दालन आदींचा समावेश असेल. महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा, मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेल्या खेळांसंबंधितचा उपक्रमही या महोत्सवात घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here