Cricket : नगर : अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (Ahmednagar District Cricket Association) मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात एस.के. क्रिकेट अकॅडमी व १९ वर्ष वयोगटात समर्थ क्रिकेट अकॅडमी विजेता ठरल्याबद्दल आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) व उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला.
हे देखील वाचा : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
बाळासाहेब पवार स्मृती करडंक जिल्हा स्तरीय लेदरबॅाल क्रिकेट स्पर्धाचा पहिला अंतिम सामना 14 वर्षांखालील मुलांचा एस के क्रिकेट अकादमी विरूद्ध समर्थ क्रिकेट अकादमी यांच्यात झाला. एस के क्रिकेट अकादमी संघाने हा सामना सात गडी राखुन जिंकून बाळासाहेब पवार 14 वर्षांखालील स्मृती करंडक पटकावला. यात समर्थ क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्वबाद 83 धावा केल्या. अभिराम गोसावी 25 धावा, अमेय गायकवाड नाबाद 15 धावा केल्या. आदित्य भापकर 14 धावा, जय गोंदकर, अभय कोतकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तन्मय कोल्हे, डी शौर्या प्रत्येकी एक बळी मिळविला. कुशल पाटील याने 14 धावांत 3 बळी घेतले. एस के क्रिकेट अकादमी संघाने 17. 2 षटकात 3 बाद 86 धावा केल्या. डी शौर्या याने नाबाद 31 धावा केल्या तसेच जय गोंदकर याने 20 धावा केल्या .गोलंदाजी समर्थ क्रिकेट अकादमी अभिराम गोसावी 15 धावांत 2 बळी घेतले. एस. के. क्रिकेट अकादमी संघाचा कुशल पाटील सामनावीर ठरला.
नक्की वाचा : ‘फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा’: राधाकृष्ण विखे पाटील
स्पर्धेचा दुसरा अंतिम सामना 19 वर्षांखालील मुलांच्या समर्थ क्रिकेट अकादमी विरुद्ध प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी यांच्यात झाला. समर्थ क्रिकेट अकादमी संघाने हा सामना 20 धावांनी जिंकून 19 वर्षांखालील बाळासाहेब पवार स्मृती करंडक उंचावला. समर्थ क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली, ऋषिकेश दौंड 53 धावा,स्वरुप मोरे 42 धावा ,तर रवि शंकर गिरवलकर याने नाबाद 26 धावा केल्या, गोलंदाजी प्रियदर्शनी, अंकुश प्रजापती 31 धावांत 2 बळी मिळविले तर विशाल यादव, सार्थक फरगडे यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. प्रियदर्शनी क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 7 बाद 128 धावा केल्या. प्रणय सिसवाल याने 55 चेंडूत 62 धावा केल्या. तनिष आमने 13 धावा, श्रेयान बोरावके याने नाबाद 12 धावा केल्या. गोलंदाजी समर्थ क्रिकेट अकादमी, जयेश जायभाय याने 21 धावांत 3 बळी घेतले. निमेश शिदोरे, ओम पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. समर्थ क्रिकेट अकादमी संघाचा जयेश जायभाय सामनावीर ठरला.
पारितोषिक वितरणाच्या वेळी सी.ए अशोक पितळे, प्रा. माणिक विधाते, सुमतीलाल कोठारी, मुकेश मुळे, गौरव पितळे, ज्ञानेश चव्हाण, क्रॉम्प्टन कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर अविनाश पाटील, कपिल पवार, निखिल पवार, सोमनाथ नजान, भरत पवार, डॉ. राहुल पवार, संदीप पवार, दिलीप पवार, श्रीकांत निंबाळकर, सागर बनसोडे, प्रेम कांबळे, अजय कविटकर आदींसह खेळाडू उपस्थित होते. कपिल पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रमिला सुपेकर यांनी आभार मानले.
मुलींच्या प्रदर्शनीय सामन्यातील सामनावीर – स्वामिनी बेलेकर
१४ वर्षांखालील स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके-
मालिकावीर -अभय कोतकर
सर्वोत्कृष्ट गोलंदाज – अभिराम गोसावी
सर्वोत्कृष्ट फलंदाज – राघव नाईक
१९ वर्षांखालील स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके-
मालिकावीर – अंकुश प्रजापती
सर्वोत्कृष्ट गोलंदाज – प्रज्वल पंधारे
सर्वोत्कृष्ट फलंदाज – प्रणय सिस्वाल