Milk : खासगी दूध संस्थांनाही अनुदान द्या; जनसंघर्षची मागणी

Milk : खासगी दूध संस्थांनाही अनुदान द्या; जनसंघर्षची मागणी

0
Milk : खासगी दूध संस्थांनाही अनुदान द्या; जनसंघर्षची मागणी
Milk : खासगी दूध संस्थांनाही अनुदान द्या; जनसंघर्षची मागणी

Milk : संगमनेर : राज्य शासनाने २० डिसेंबर २०२३ रोजी अधिवेशन काळात सहकारी संस्थांना दूध (Milk) देणार्‍या दूध उत्पादक (Milk producer) बांधवाना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची आणि ३.२/८.२ गुणवत्तेच्या दुधाला २९ रुपये बाजारभाव देण्याची घोषणा केली. याबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा दूध उत्पादक शेतकर्‍यांनी संगमनेर येथील विश्रामगृहात सत्कार केला. मात्र, राज्यात ७० टक्के दूध खासगी संस्थांना दिले जाते, म्हणून त्यांनाही अनुदान द्यावे, अशी मागणी जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे (Sandeep Darade) यांनी केली.

नक्की वाचा : ‘फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा’: राधाकृष्ण विखे पाटील


यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासित केले, की ३.२/८.२ गुणवत्तेच्या दुधाला जर सहकारी तथा खासगी संस्थांनी २९ रुपये बाजारभाव दिला नाही तर कारवाई केली जाईल. खासगी संस्थांकडून डेटा कलेक्ट होऊ शकत असेल तर याची पडताळणी पुढील ७ दिवसांत करून त्यांनाही अनुदान देण्याचं काम नक्कीच करू. तसेच ज्या सहकारी दूध डेअर्‍या आहेत, परंतु ते दूध जर खासगीला देत असतील तर त्यांनाही अनुदान देऊ असे सांगितले. सोबतच पशुखाद्याचे भाव कमीबाबतही लवकरच सविस्तर चर्चा घडवून आणू, भेसळबाबतही कठोर कारवाई करून नियंत्रण आणले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी जनसंघर्ष संघटनेचे हृषीकेश गुंजाळ, योगेश गुंजाळ आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

हे देखील वाचा : आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here