
नगर : राज्यात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असल्या तरी त्यांना जात प्रमाणपत्र दिली जात नाहीत, त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी ज्यांनी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना ते देण्यात आलं आहे, या बाबतीत प्रलंबित प्रकरणं कमी आहेत,असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल,पण उद्योजकांना नको; गुलाबराव पाटलांच्या विधानानं नवा वाद
मराठा समाजासाठी महायुतीचे अनेक निर्णय (Devendra Fadanvis)

महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले आहेत ते या आधीच्या कोणत्याही सरकारने घेतले नाहीत. यातूनही जर काही राहिलं आहे असं कुणाला वाटत असेल तर त्यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. नागपूरच्या पावसासंबंधी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नागपुरात पाच वाजेनंतर मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिथे काही ठिकाणी कामं सुरू आहेत, ती अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी साचलं. पण एका तासात जर जास्त पाऊस पडला तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा नाही.”
अवश्य वाचा : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकलं,धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
‘पीक विमा योजनेत बोगसगिरी झाली’ (Devendra Fadanvis)
पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांची नावे कमी झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपण एका रुपयात पीक विमा देतो. त्यामुळे सर्वांनीच तो पीक विमा काढला. पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोगसगीरी झाल्याचं समोर आलं. त्यावर आपण कारवाई केली. त्यामुळेच आता त्याच्या लाभाची संख्या कमी आली आहे.”


