Narendra Modi :’काँग्रेसने ४० जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील’: नरेंद्र मोदी 

Narendra Modi : काँग्रेसने येत्या निवडणुकीत ४० जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील, ते आज आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

0
Narendra Modi
Narendra Modi

नगर : काँग्रेसने येत्या निवडणुकीत ४० जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील, ते आज आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानताना (Vote of Thanks) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली आहे. यावेळी काँग्रेसच्या व्हीआयपी कल्चरबाबतही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. लाल दिव्याची संस्कृती का सुरू ठेवली, काँग्रेसने ब्रिटिश कायदा का बदलला नाही,असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा : शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पक्ष व चिन्हांची नावे आली समोर       

काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्थितीला काँग्रेसच जबाबदार (Narendra Modi)

पंतप्रधानांनी यापूर्वी ५ फेब्रुवारीला लोकसभेला संबोधित केले होते. आज राज्यसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीपासूनच काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसले. पंतप्रधान म्हणाले की, काही लोकांवर टीका करणे हा नाईलाज झाला आहे आणि त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो असं म्हणत पंतप्रधान काँग्रेसकडे बोट दाखवत होते. मोदी म्हणाले की, ‘मी मल्लिकार्जुन खरगे यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत होतो आणि मला त्याचा खूप आनंद झाला. लोकसभेत जी मनोरंजनाची उणीव होती ती तुम्ही पूर्ण केली. खर्गे इतकं बोलू शकले कारण त्या दिवशी ते बोलत होते. तेव्हा त्यांचे दोन कमांडर बसले नव्हते. खर्गे त्या दिवशी म्हणाले होते की एनडीए देशात ४०० जागा जिंकेल. मात्र आगामी निवडणुकीत काँग्रेसला ४० जागाही मिळाल्या तर ती त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्थितीला काँग्रेस पक्षच जबाबदार असल्याचे पंतप्रधान म्हणालेत.

अवश्य वाचा : ऑस्ट्रेलियात खासदाराची ‘भगवत’ गीतेच्या साक्षीने शपथ

मोदींनी चढवला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर हल्ला (Narendra Modi)

पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, नेहरूंना आरक्षण आवडत नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात होते. गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारने प्रत्येक विभागाला पुढे नेण्याचे काम केले आहे. आमच्या सरकारने गरीब, दलित आणि मागासलेल्या लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला,असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही पहा: ऑस्ट्रेलियात खासदाराची ‘भगवत’ गीतेच्या साक्षीने शपथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here