Ganeshotsav : नगर : गणेशोत्सवाला (Ganeshotsav) अवघे पाच दिवस उरले आहेत. ठिकठिकाणी मंडप देखील उभारले जात आहेत. बाजारात मखर, सजावटीचे तसेच गणरायाच्या मोहक मूर्ती पाहायला मिळत आहे. मात्र, यंदा राज्यात पाऊस (Rain) कमी पडल्यामुळे सर्वत्र दुष्काळग्रस्त (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट पसरले.
नक्की वाचा : लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणात ४४ लाखांची नुकसानभरपाई; तडजोडीने प्रकरण निकाली
दीड महिन्यापासून पाऊस गायब
‘अल निनो’च्या प्रभावामुळे मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुरेशा पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. राज्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला काही भागात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर अल निनो सक्रिय झाल्याने पावसाने दडी मारली. दीड महिन्यापासून पाऊस गायब असल्याने. पाण्याअभावी सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी आणि बाजरी यांसारखी खरिपाची पिके जळू लागली आहेत. बळीराजा मेटाकुटीला आला आहे. हवामान विभागाने 14 सप्टेंबर नंतर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ग्राहकांची खरेदीसाठी लगबग (Ganeshotsav)
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी मंडप देखील उभारण्यात येत आहेत. बाजारपेठेत आकर्षक गणपती मूर्ती, मखर तसेच सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल लागले आहे. बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. बाजारात पीओपीच्या मूर्तींना मोठ्याप्रमाणात मागणी आहे. शाडू मातीच्या मूर्तींच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती स्वस्त, वजनाने हलक्या आणि वाहतुकीस सुलभ असल्याने नागरिक त्यांना पसंती देत आहेत. पण या सगळ्याचे दर पाहता मोठ्या प्रमाणावर सामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे.
गणेशमूर्तींच्या दरात वाढ
कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे गणेशमूर्तींच्या दरात सरासरी 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. आखाती देशांतील युद्ध, पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती व पीओपीच्या दरवाढीचा परिणाम बाप्पाच्या मूर्तींवर होणार आहे. त्यामुळे मूर्तीसाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गणरायाची मूर्ती घडवताना पीओपी बॅग, रंग, सजावटीचे साहित्य त्याचबरोबर कच्च्या मालासाठी वाहतूक खर्च या सगळ्याचा ताण मूर्तिकारांवर पडत आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सणाचा उत्साह वाढण्यापेक्षा कमी होणार का असा प्रश्न पडला आहे



