Godakath Festival : गोदाकाठ महोत्सवात ४५ लाखांची उलाढाल

Godakath Festival : गोदाकाठ महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री त्या जोडीला शालेय विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या कार्यक्रमाचा मिळणारा आस्वाद घेवून नागरिक मंत्रमुग्ध होत आहेत.

0
Godakath Festival

Godakath Festival: कोपरगाव : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या (Priyadarshini Indira Mahila Mandal) अध्यक्ष पुष्पा काळे (Pushpa Kale) व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे (Chaitali Kale) यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (Mahatma Gandhi Charitable Trust) (प्रदर्शन) कोपरगाव (Kopargaon) येथे आयोजित करण्यात आले होते. गोदाकाठ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी केलेल्या तुफान गर्दीमुळे दोनच दिवसात जवळपास ४५ लाखाची उलाढाल (45 lakh turnover) या ठिकाणी झाली आहे.

नक्की वाचा : ग्रंथ प्रदर्शनाला पारनेरकरांचा उदंड प्रतिसाद

बचत गटाच्या महिलांनी घरबसल्या छोटे-मोठे उद्योग सुरु करून उत्पादित केलेल्या तयार मालाला गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून हक्काची शाश्वत बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाचा नावलौकिक राज्यभर पसरला आहे. दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती वाढत चाललेली आहे. चार दिवस चालणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे जवळपास ४५ लाखाची विक्री होवून विविध वस्तू व खाद्य पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बचत गटाच्या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.

अवश्य वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संगमनेरात तीव्र आंदोलन   

शुक्रवार (ता.५) पासून सुरु झालेल्या या गोदाकाठ महोत्सवामध्ये कोपरगाव शहर व तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी विविध प्रकारच्या तयार मालांचे एकूण ३०० स्टॅाल्स थाटले आहेत. गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी बचत गटांच्या महिलांना अल्प दरात ना नफा ना तोटा या तत्वावर स्टॅाल्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महिला बचत गटांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.  

गोदाकाठ महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री त्या जोडीला शालेय विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या कार्यक्रमाचा मिळणारा आस्वाद घेवून नागरिक मंत्रमुग्ध होत आहेत. सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रत्येक स्टॉल्सवर खरेदीसाठी होत असलेल्या मोठ्या गर्दीचा विचार करता रविवारी सुटीच्या दिवशी मोठी गर्दी होणार असल्यामुळे विक्रेत्यांनी जास्तीत जास्त माल आणून ठेवला होता. महिला बचत गटाचे आर्थिक सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना आपले कला, गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ त्याचबरोबर समाजात आदर्शवत कामगिरी करणाऱ्या समाजकारणी व्यक्तींना समाज कार्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांचा यथोचित सन्मान गोदाकाठ महोत्सवात दरवर्षी आवर्जून केला जातो.

यावर्षी देखील कोपरगाव मतदारसंघातील स्वच्छता दूत, वृत्तपत्र विक्रेते, महिला बचत गटांच्या सदस्या, आदर्श ग्रामसेवक, आदर्श शिक्षक, महिला मंडळ, ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त देवस्थानांच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य तसेच विविध क्षेत्रात पुरस्कार मिळविलेल्या कोपरगावच्या भूमीपुत्रांचा माजी आमदार अशोकराव काळे, गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे, आमदार आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या पदाधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, संलग्न संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला मंडळांच्या सदस्या, शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here