नगर : मलेशियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलेशियात (Malaysia)आज (ता.२३) दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेमध्ये भीषण धडक (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत १० जणांचा मुत्यू झाल्याची माहिती समोर आली असून घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. अपघात मृत्यू झालेले दहा जण पायलट होते. मात्र या अपघातात कोणीही वाचले नसल्याचं सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा : यशस्वीची ‘यशस्वी’ खेळी; शतक ठोकत मुंबईला नमवलं
रॉयल मलेशियन नेव्हीचा नेव्हीच्या परेड दरम्यान घडली घटना (Helicopter Accident)
मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लष्करी तालीम सुरु होती. याच दरम्यान ही घटना घडली. हवेमध्ये झालेल्या लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरच्या धडकेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून त्यांचे मृतदेह लष्कराच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ही घटना आज सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान मलेशियाच्या लुमुट नौदल तळावर घडली आहे.
अवश्य वाचा : मी मनोज जरांगेंवर टीका केली नाही,केली तर शब्द मागे घेत नाही-पंकजा मुंडे
दोन हेलिकॉप्टरची हवेमध्ये धडक (Helicopter Accident)
मलेशियाच्या नौदलाने याबाबत एका निवेदनात सांगितले की, रॉयल मलेशियन नेव्हीच्या परेड दरम्यान हा अपघात घडला. या घटनेच्या व्हिडीओमध्ये असे दिसते की, लष्कराच्या काही हेलिकॉप्टरची परेड सुरु आहे. मात्र, यातील दोन हेलिकॉप्टरची हवेमध्ये धडक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे दोन्ही हेलिकॉप्टरचे रोटर कापले गेले आणि दोन्हीही हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. दरम्यान, या घटनेची चौकशी होणार असून यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.