Accident : राहुरी : तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात अवैध मुरूम उत्खनन (Illegal Murum mining) करणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी (Seriously Injured) झाला असल्याची घटना झाली आहे. जखमी अजिंक्य आदीनाथ वाणी (Ajinkya Wani) या तरुणाच्या दोन्ही पायाला फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नक्की वाचा : कोरठण खंडोबा येथे हरीनाम सप्ताहाचे आयोजन
अवैध मुरूम उत्खननाकडे महसूल प्रशासनाचे लक्ष (Accident)
राहुरी तालुक्यातील कणगर, चिंचविहिरे, ताहाराबाद, राहुरी कारखाना, देवळाली प्रवरा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध मुरूम उत्खनन सुरू असून महसूल प्रशासन याकडे सातत्याने काना डोळा करीत आहे. शनिवारी (ता. १३) सायंकाळी चिंचविहिरे-ताहाराबाद रस्त्यावर श्रीराम मंदिराजवळ मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अजिंक्य आदीनाथ वाणी (वय-२२) हा तरुण गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती समजताच स्थानिक तरुण व रुग्णवाहिका चालकांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमीवर नगरमध्ये उपचार सुरु (Accident)
अवश्य वाचा : राम मंदिर लोकार्पणाचे अण्णा हजारेंना निमंत्रण
जखमी अजिंक्य वाणी यास राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असल्याने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील दहा दिवसांपूर्वी चिंचविहिरे येथील एका महिलेला अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनाने धडक दिली. यात ही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पुन्हा अपघात घडल्याने ग्रामस्थांमधुन अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज प्रश्नी तातडीने लक्ष घालावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडु, असा इशारा कणगर, चिंचविहिरे, गणेगाव परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.