Jasprit Bumrah :भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रमवारीत अव्वल

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. वनडे, टी 20 आणि कसोटीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह पहिलाच गोलंदाज ठरलाय.

0
Jasprit Bumrah
Jasprit Bumrah

नगर : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. वनडे, टी २० आणि कसोटीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा (ICC Rangking) जसप्रीत बुमराह पहिलाच गोलंदाज ठरला. आज (ता.७) आयसीसीने (ICC) कसोटी क्रमवारी जारी केली.

नक्की वाचा : ‘काँग्रेसने ४० जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील’: नरेंद्र मोदी

जसप्रीत बुमराहचे जोरदार कमबॅक (Jasprit Bumrah)

जसप्रीत बुमराह याने नुकतेच इंग्लंड विरोधात दुसऱ्या कसोटी सामन्यात नऊ विकेट घेतल्या होत्या. पहिल्या सामन्यातही त्याने भेदक गोलंदाजी केली होती. जसप्रीत बुमराह याने जोरदार कमबॅक करत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने आर अश्विनला खाली खेचत अव्वल स्थान काबीज केले. फक्त ३४ कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने अव्वल स्थानावर झेप घेतली. आघाडीच्या दहा गोलंदाजामध्ये जसप्रीत बुमराहशिवाय आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.

अवश्य वाचा : ऑस्ट्रेलियात खासदाराची ‘भगवत’ गीतेच्या साक्षीने शपथ

जसप्रीत बुमराह ८८१ अंकासह पहिल्या स्थानावर (Jasprit Bumrah)

ताज्या क्रमवारीनुसार,आर अश्विन याला दोन अंकाचा फटका बसलाय. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. जसप्रीत बुमराह ८८१ अंकासह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.त्याच्याकडे ८५१ पॉईंट्स आहेत. तर आर.अश्विन ८४१ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा स्टार फिरकी गोलंदाज  रवींद्र जडेजा ७४६ पॉईंट्ससह नवव्या क्रमांकावर विराजमान आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता त्याने जोरदार कमबॅक केले.
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here