Iran Strike in Pakistan: इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त

Iran Strike in Pakistan: दहशतवादी संघटना जैश-अल-अदलचे सर्वात मोठे मुख्यालय होते. या मुख्यालयासह दहशतवाद्यांचा आणखी एक अड्डा उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणच्या वतीने करण्यात आला आहे.

0
Iran Strike in Pakistan
Iran Strike in Pakistan

Iran Strike in Pakistan: नगर  : पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून दहशतवादी कारवायांनी त्रस्त झालेल्या इराणने पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. इराणने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक (Iran Strike in Pakistan) करत दहशतवादी संघटना जैश अल-अदलचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या सर्जिकल स्ट्राइक (Surgical strike)मध्ये अनेक दहशतवादी (terrorist) मारले गेल्याचा दावा इराणी सैन्याने केला आहे.

हेही वाचा :  अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक ; धडकेत एक जखमी

दहशतवादी हल्ले (Iran Strike in Pakistan)

मागील काही महिन्यांपासून इराणी सैन्य आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-अल-अदल यांच्यात चांगलीच चकमक सुरू आहे. सुरुवातीला जैश अल-अलदने इराणच्या सीमाभागात दहशतवादी हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर इराणने पाकिस्तानला बजावले देखील होते. मात्र, तरी देखील जैश अल-अलदकडून इराणवर दहशतवादी कारवाया सुरूच होत्या.

अवश्य वाचा :  संक्रांतीच्या दिवशी चिकनच्या दुकानात वाद; युवकाचा खून

इराणचा दावा (Iran Strike in Pakistan)

गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानमधील एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. ज्यात १४ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. इराणच्या लष्कराने काल रात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या भागात क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या भागात दहशतवादी संघटना जैश-अल-अदलचे सर्वात मोठे मुख्यालय होते. या मुख्यालयासह दहशतवाद्यांचा आणखी एक अड्डा उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणच्या वतीने करण्यात आला आहे.

इराण हा शिया बहुसंख्य देश आहे, तर पाकिस्तानमधील सुमारे 95% लोक सुन्नी आहेत. पाकिस्तानातील सुन्नी संघटना इराणला विरोध करत आहेत. याशिवाय बलुचिस्तानची जैश-अल-अदल ही दहशतवादी संघटना इराणच्या सीमेत घुसून तेथील लष्करावर अनेकदा हल्ले करत आहे. इराणच्या सैन्याला रिव्होल्युशनरी गार्ड म्हणतात. दहशतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इराण सरकारने पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे.

नक्की वाचा : नगरच्या रेल्वे स्थानकात अतिरेकी घुसले.. पोलिसांनी पकडले; पण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here