Lagna Kallol: १ मार्चला होणार ‘लग्न कल्लोळ’; चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसत आहे.

0
Lagnkallol
Lagnkallol

Lagna Kallol: नगर : प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर तिरमखे (Dr. Mayur Tirmakhe) दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरमध्ये भूषण प्रधान (Bhushan Pradhan), मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

नक्की वाचा : ‘बहिर्जी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित ;एकदा पहाच!  

लग्नकल्लोळ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर (Lagna Kallol )

लग्नकल्लोळ या चित्रपटाच्या या नवीन पोस्टर सोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. हा चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे हे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

अवश्य वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त

लग्नकल्लोळ चित्रपटाची कथा नेमकी काय?(Lagna Kallol )

‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट ‘लग्न’ या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसत आहे. मात्र आता यात काय ‘कल्लोळ’ पहायला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, “लग्न हा विषय तसा म्हटला तर अतिशय जिव्हाळयाचा. हा विषय घेऊन अतिशय सुंदररित्या या चित्रपटाचे लेखन करण्यात आले आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना हा अंदाज आला असेलच की, हा चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. यात हसू आहे, आसूही आहेत. त्यामुळे आता या ‘लग्न कल्लोळा’त सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here