Maratha Reservation : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे

Maratha Reservation : जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही, ज्याला सामान्यांची गरज राहिलेली नाही, त्यांच्याकडून अशा अपेक्षा करण्याची काय गरज आहे. आम्ही लढून आरक्षण मिळवतो, हात पसरवण्याची गरज नाही, असं मनोज जरांगेनी म्हंटल आहे.

0
Manoj Jarange
Manoj Jarange

नगर : पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही, आम्ही लढून आरक्षण मिळवणार असल्याचं म्हणत मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरूनमनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

नक्की वाचा : इराणचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक; दहशतवाद्यांचं मुख्यालय उद्ध्वस्त

‘पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही’ : मनोज जरांगे (Maratha Reservation)

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही, मराठ्यांनी देखील त्यांची अपेक्षा सोडून द्यावी. त्यांचा महाराष्ट्रात येण्याचा आम्हाला काय फायदा आहे. तुम्ही सामान्यांचे नेतृत्व केलेले आहे, तुम्ही राज्य सरकारला आदेश देऊन टाका हे आम्ही त्यांना शिर्डीच्या दौऱ्यावर असतानाच आवाहन केले होते.

अवश्य वाचा : १ मार्चला होणार ‘लग्न कल्लोळ’; चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित  

‘आम्ही लढून आरक्षण मिळवतो, हात पसरवण्याची गरज नाही’ (Maratha Reservation)

जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही, ज्याला सामान्यांची गरज राहिलेली नाही, त्यांच्याकडून अशा अपेक्षा करण्याची काय गरज आहे. आम्ही लढून आरक्षण मिळवतो, हात पसरवण्याची गरज नाही. एकदा आम्ही त्यांना विनंती केली होती. राज्यात एवढं वातावरण ढवळून निघाले असतांना पंतप्रधानांनी त्यात हस्तक्षेप करणं गरजेचं होतं. पंतप्रधानांनी आरक्षण देऊन टाका एवढे शब्द काढणे अपेक्षित होतं. मात्र, आता त्यांच्याकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडली आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात येऊ की कुठेही येऊ, मराठ्यांनी त्यांची अपेक्षा सोडावी, असेही जरांगे म्हणाले आहेत.

आम्ही २० जानेवारीला मुंबईला निघणारच,आम्हाला मुंबईला जाण्याची कोणतेही हौस नाही. मुंबईमध्ये सुद्धा आमचेच बांधव असून, त्यांनी होणार त्रास काही दिवस सहन करावा. विनाकारण मुंबईला त्रास देण्याचं काम सरकारच करत असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here