Jai Anand Foundation : स्वच्छतेचा प्रसार; जय आनंद फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

Jai Anand Foundation : स्वच्छतेचा प्रसार; जय आनंद फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

0
Jai Anand Foundation

Jai Anand Foundation : नगर : नगर शहराच्या (Nagar city) स्थापनेत महत्त्वाची ठरलेली वास्तू म्हणजे भुईकोट किल्ला. या किल्ल्याचा परिसर श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छ (Clean) करून जय आनंद फाउंडेशनने (Jai Anand Foundation) अनोखा उपक्रम राबविला. या उपक्रमाची नगर शहरात सध्या चर्चा होत आहे.

Jai Anand Foundation

हे देखील वाचा: पारगाव येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात जबरी चोरी

स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता (Jai Anand Foundation)

नगर शहराची स्थापना २८ मे १४९० रोजी झाल्याचे मानले जाते. अहमद निजामशहाने ज्या ठिकाणी नगर शहर स्थापनेचा निर्णय घेतला तेथे त्याने एक महाल बांधला. त्यालाच कोटबाग-ए-निजाम म्हणजेच भुईकोट किल्ला म्हटले जाते. हा किल्ला ज्याच्या ताब्यात तोच नगर शहर व परिसराचा अधिपती होत असे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या किल्ल्याच्या भोवती जिल्हा प्रशासनाने जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. या जॉगिंग ट्रॅकची साफसफाई जय आनंद फाउंडेशनच्या सदस्यांनी केले. अस्वच्छतेबाबत प्रशासनाला दोष देण्यापेक्षा स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता उपक्रम राबवत स्वच्छतेचा प्रसार करावा, असा संदेश या अनोख्या उपक्रमातून देण्यात आला.

Jai Anand Foundation

नक्की वाचा: आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक; ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंदची हाक

ऐतिहासिक वास्तू परिसरात स्वच्छता मोहीम (Jai Anand Foundation)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे देशभरात स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती झाली आहे. ऐतिहासिक वास्तू परिसरातही स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या काही मोजक्याच संघटना पुढाकार घेताना दिसत आहेत. यात जय आनंद फाउंडेशनचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here