Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या ‘देवरा’चं फर्स्ट लूक पोस्टर आऊट

'देवरा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील जान्हवी कपूरचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

0
Janhvi Kapoor
Janhvi Kapoor

नगर : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) त्याच्या आगामी ‘देवरा’ (Devara) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) फर्स्ट लूक आऊट झाला आहे. जान्हवीच्या वाढदिवशी निर्मात्यांनी तिचा हा लूकप्रदर्शित करत तिला भेट ही दिली आहे. पोस्टर आऊट करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,”आमची थंगम जान्हवी कपूरला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा”.

नक्की वाचा : अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर ; ‘इंद्रायणी’ च्या शीर्षक गीताला प्रेक्षकांची पसंती

जान्हवीच्या ‘देवरा’ची चाहत्यांना उत्सुकता (Janhvi Kapoor)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. एकीकडे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे काही चाहते तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ‘देवरा’तील जान्हवीचं फर्स्ट लूक पोस्टर आऊट झाल्याने चाहत्यांची सिनेमाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘देवरा’ ब्लॉकबस्टर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर काही चाहते जान्हवी आणि ज्युनियर एनटीआरला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अवश्य वाचा : आता ऑनलाईन घोटाळ्यांना बसणार आळा; भारत सरकारकडून ‘चक्षु’ पोर्टल लॉन्च

‘देवरा’ कधी रिलीज होणार ?(Janhvi Kapoor)

‘देवरा’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कोरताला शिवाने सांभाळली आहे. निर्माते एप्रिल महिन्यात हा सिनेमा रिलीज करू शकतात. ज्युनियर एनटीआरचा हा सिनेमा १० एप्रिल २०२४रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘देवरा’ या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर सैफ अली खान या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ज्युनियर एनटीआरसह दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण सोबतही जान्हवी स्क्रीन शेअर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here