Jhimma 2 Trailer : ‘झिम्मा-२’ चा ट्रेलर रिलीज 

'झिम्मा-२' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

0
156

नगर : ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘झिम्मा-२’ (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टीझर रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

नक्की पहा : राज्यात पुढील २४ तासात पावसाची शक्यता

झिम्मा-२  या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात निर्मिती सावंत आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सीनने होते. या सीनमध्ये दिसत आहे की, निर्मिती सावंत  या कार चालवत आहेत, तितक्यात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटते. त्यानंतर ट्रेलरमध्ये झिम्मा-२ या चित्रपटामधील एक-एक भूमिकांची माहिती देण्यात आली आहे. ट्रेलरमधील कलाकारांच्या अभिनयानं लक्ष वेधले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील “फक्त आई होणं म्हणजे, बाई होणं नसतं”, या निर्मिती सावंत यांच्या डायलॉगनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

अवश्य वाचा :  मानसी नाईकची ‘लावा फोन चार्जिंगला’ लावणी  प्रेक्षकांच्या भेटीला

सिद्धार्थ चांदेकरनं झिम्मा-2 या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात  सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सयाली संजीव, मृण्मयी गोडबोले  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता झिम्मा-२ चित्रपटात रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे या दोघी महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत. २४ नोव्हेंबर रोजी झिम्मा-२  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.