Kanni Movie: हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’ चित्रपटातील रॅप साँग प्रदर्शित

'कन्नी' या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हे एक जबरदस्त रॅप साँग असून 'नवरोबा' असे या गाण्याचे बोल आहेत.

0
Kanni Movie
Kanni Movie

नगर : बहुप्रतीक्षित ‘कन्नी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हे एक जबरदस्त रॅप साँग (Rap Song) असून ‘नवरोबा’ (Navroba) असे या गाण्याचे बोल आहेत. यात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) तिच्या जोडीदाराची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे. पुन्हा पुन्हा ऐकावे अशा या गाण्याला ज्योती भांडे आणि सीज़र यांनी गायले असून चैतन्य कुलकर्णी यांचे कमाल बोल या गाण्याला लाभले आहेत. तर एग्नेल रोमन यांनी जबरदस्त संगीत दिले आहे. या गाण्यात हृतासोबत शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहरही दिसत आहेत.

नक्की वाचा : करण जोहरच्या लव्ह स्टोरीयाचा ट्रेलर प्रदर्शित   

हृताची नजर ‘नवरोबा’ वर (Kanni Movie)

या गाण्यात मित्रांमध्ये असतानाही हृताची नजर तिच्या आयुष्यात येणाऱ्या ‘नवरोबा’ च्या शोधात दिसत आहे. फार आतुरतेने ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवऱ्याची वाट पाहात असून संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुलात ती ‘नवरोबा’ शोधतेय. हृताचा हा ‘नवरोबा’ चा शोध संपणार का, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी हे ‘कन्नी’चे निर्माते आहेत. ८ मार्चला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

अवश्य वाचा : अभिजीत पानसे यांच्या ‘रानबाजार २’ची घोषणा  

मैत्री, प्रेम, स्वप्ने यांभोवती फिरणारा ‘कन्नी’ चित्रपट (Kanni Movie)

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “हा मैत्री, प्रेम, स्वप्ने यांभोवती फिरणारा चित्रपट आहे, त्यामुळे त्यातील गाणीही तितकीच एनर्जेटिक असावी, असे मला वाटत होते आणि ‘नवरोबा’च्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली. या गाण्याची संपूर्ण टीम अफलातून आहे. चैतन्यचे बोल आणि एग्नेल रोमनचे उत्स्फूर्त संगीत या गाण्यात प्रचंड ऊर्जा आणत आहेत. त्यात ज्योती भांडे आणि सीजर यांची गायकी. सगळेच मस्त जमून आले आहे. रेकॉर्डिंग करताना आम्ही हे गाणे खूप एन्जॉय केले. मला खात्री आहे संगीतप्रेमींच्या ओठांवर हे गाणे रेंगाळेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here