Kunbi : श्रीरामपूर : कुणबी (Kunbi) प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही सेतू चालकांनी अडवणूक केल्यास तसेच प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागितल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार वाघ यांनी सकल मराठा समाजाला दिले. श्रीरामपूर सकल मराठा समाजाचे प्रतिनिधींनी तहसीलदार वाघ व नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांची भेट घेतली. त्यावेळी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही सेतू चालकांनी अडवणूक केल्यास तसेच प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागितल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार वाघ यांनी सकल मराठा समाजाला दिले.
हे देखील वाचा: ‘लाेकसभे’ला लाेकांची पसंती कुणाला; सर्व्हेची धक्कादायक आकडेवारी समाेर
हजारो रुपयांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी (Kunbi)
यावेळी सुरेश कांगुणे यांनी सांगितले की, श्रीरामपूर तालुक्यात कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याकरिता महसूल विभागाने अनेक ठिकाणी लाभार्थींच्या सोयीकरता शिबिरे आयोजित करून कागदपत्रे घेतलेली आहेत. त्यामधील काही बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. मराठा बांधवांना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे याकरिता मोठ्या प्रमाणात सहकार्य व मदत लाभत आहे. परंतु काही सेतू चालकांकडून कुणबी प्रकरण दाखल करून घेण्यासाठी अडवणूक केली जात आहे. त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र करिता काही सेतू चालक ५० रुपये फी घेण्याऐवजी हजारो रुपयांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदार यांनी लक्ष घालावे,अशी मागणी केली.
हे देखील वाचा: मुंबई काँग्रेसला धक्का;बाबा सिद्दीकींचा पक्षाला रामराम
जादा पैसे घेऊ नये अशा सूचना (Kunbi)
यावेळी तहसीलदार वाघ म्हणाले की, सदरचा प्रकार अतिशय गंभीर आहे. मराठा बांधवांची अडवणूक झाल्यास किंवा जादा पैसे सेतू चालकाने मागितल्यास आपल्याशी संपर्क साधावा. या संदर्भात सर्व सेतू चालकांची मिटिंग घेऊन त्यांना कोणत्याही व्यक्तींची निष्कारण अडवणूक करू नये तसेच जादा पैसे घेऊ नये अशा सूचना दिल्या जातील. त्यानंतरही जर असे घडले तर संबंधित सेतू चालकावर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले.
यावेळी नागेश सावंत, श्रीकृष्ण बडाख, राजेंद्र मोरगे, राजेंद्र भोसले आदींनी कुणबी दाखल्याबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या. याप्रसंगी अनिल उंडे, शरद मामा नवले, गोकुळ गायकवाड, अमोल बोंबले, शशिकांत गायधने, सुधाकर तावडे, भाऊसाहेब गायधने, चंद्रकांत शेळके, बाळासाहेब मेटे, चंद्रकांत काळे, दत्तात्रय जाधव, सुनील उंडे, चैतन्य गायधने, प्रसाद खरात, निखिल शेळके, सागर थोरात, सुधीर गडाख, किशोर घोरपडे, दिलीप थोरात, महेश बोंबले, रावसाहेब भोसले, ऋषिकेश मोरगे, जालिंदर कर्जुले आदी मराठा बांधव उपस्थित होते.