काेड रेड
Law and Order : नगर : नगर शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलिस (Police) अधिनियमचे कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार २० जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश (Restraining order) जारी केले आहे.
हे देखील वाचा : भगवं वादळ मुंबईच्या दिशेने रवाना; मनाेज जरांगे पाटलांची उद्या नगरमध्ये दीडशे एकरावर सभा
२० जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश (Restraining order)
नगर जिल्ह्यात सभा, महासभा, आंदाेलनाच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी २० जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडुके, बंदुका आदी वस्तू बाळगण्यास, तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे काेणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे.
नक्की वाचा : साडेबारा एकर भूखंड प्रकरणात ‘त्या’ १०० ते १५० कुटुंबांना तूर्तास दिलासा
या व्यक्तींना असणार सूट (Restraining order)
हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींंना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्यांना लागू होणार नाही. तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, मिरवणूका, लग्न समारंभासाठी ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहायक पोलीस निरीक्षक यांची रीतसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.