Kiran Lahamte : रब्बी आवर्तनाचे व्यवस्थित नियोजन करा : डॉ. किरण लहामटे

Kiran Lahamte : अकोले : तालुक्यातील आढळा खोऱ्यातील देवठाणचे आढळा, सांगवी व पाडोशी या तिन्ही धरणांचे रब्बी आवर्तनाचे (Rabbi circulation) नियोजन पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) व्यवस्थित करावे.

0
Kiran Lahamte

Kiran Lahamte : अकोले : तालुक्यातील आढळा खोऱ्यातील देवठाणचे आढळा, सांगवी व पाडोशी या तिन्ही धरणांचे रब्बी आवर्तनाचे (Rabbi circulation) नियोजन पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) व्यवस्थित करावे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांनी दिल्या.

हे देखील वाचा : अखेर ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आदेश जारी

कालवा सल्लागार समितीची बैठक (Kiran Lahamte)


आढळा धरण कालवा सल्लागार समितीची अकोले विश्रामगृहावर बैठक झाली, यावेळी आमदार लहामटे बोलत होते. याप्रसंगी अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, अकोले उपविभागाचे अभियंता योगेश जोर्वेकर, शाखा अभियंता रजनीकांत कवडे, महेश सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : साडेबारा एकर भूखंड प्रकरणात ‘त्या’ १०० ते १५० कुटुंबांना तूर्तास दिलासा

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Kiran Lahamte)


या प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्यातील देवठाण, वीरगाव, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे ही सहा तसेच, संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा, जवळे कडलग, धांदरफळ, निमगाव भोजापूर, चिकणी, पिंपळगाव कोंझिरा, राजापूर तर सिन्नर तालुक्यातील नळवाडी व कासारवाडी या गावातील एकूण 3913 हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात येते. उजव्या कालव्याच्या अंतर्गत 2422 तर डाव्या कालव्याच्या अंतर्गत 1491 हेक्टर क्षेत्र येते. या धरणाची क्षमता 1060 दलघफू इतकी असून धरणाचा मृतसाठा 85 दलघफू आहे. आजमितीस धरणामध्ये 977 दलघफू पाणी शिल्लक आहे. या बैठकीस कालवा निरीक्षक मयूर देशमुख, डोंगरगावचे सरपंच दशरथ उगले, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, समशेरपूरचे सरपंच एकनाथ मेंगाळ, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष पोपट दराडे, केळी रुम्हणवाडीचे माजी सरपंच मधुकर बिन्नर, अमृता गोडे, सुधीर शेळके, सुनील उगले, सुनील दराडे, केशव बोडके, वाल्मिक देशमुख, बबन सदगीर आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : मनोज जरांगेंचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here