Lok sabha : नगर ः लाेकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी नगर लाेकसभा मतदारसंघात (Constituency) २३ उमेदवारांनी ४२ अर्ज नेले आहे. परंतु, पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा अर्ज (Candidate Application) दाखल झाला नाही.
हे देखील वाचा: शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ (Lok Sabha Elections)
लाेकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नगर व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. निवडणुकीची आधिसूचना ही जारी झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येणार आहे.
नक्की वाचा: रामभक्तांच्या अलोट गर्दीने संगमनेरकर भारावले
महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये लढत (Lok Sabha Elections)
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे. महायुतीकडून डाॅ. सुजय विखे पाटील हे उमेदवार असून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके आहे. दाेन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जाेरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. नगर लाेकसभा मतदारसंघात १३ मे राेजी मतदान, तर ४ जून राेजी मतमाेजणी हाेणार आहे.
शिर्डी लाेकसभा मतदारसंघात १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले
शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले आहे.