Corruption : ‘यम है हम’ म्हणत माढ्यातल्या उमेदवाराची रेड्यावर बसून एन्ट्री; भ्रष्टाचारी लाेकांना संपवण्याचा निर्धार

Corruption : 'यम है हम' म्हणत माढ्यातल्या उमेदवाराची रेड्यावर बसून एन्ट्री; भ्रष्टाचारी लाेकांना संपवण्याचा निर्धार

0

Corruption : नगर : उन्हाचा कडाका त्यातच राज्यातलं राजकीय (Political) वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे उमेदवार शक्तीप्रदर्शन, जंगी सभा घेऊन उमेदवारी फाॅर्म भरत आहे. दुसरीकडे माढ्यातील एका उमेदवाराने चक्क यमाचा पाेशाख धारण करीत रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल (Candidate Application) केला. आपण विविध पक्षांच्या नेते (Party Leader) आणि उमेदवारांसाठी यम आहोत, असा दावा या उमेदवाराने केला. त्यामुळे या उमेदवाराने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

हे देखील वाचा: शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

राजकीय परिस्थितीसाठी उपरोधिकपणे यमाचं रुप धारण (Corruption)

यमाचा पाेशाख धारण करणाऱ्या उमेदवाराचं नाव राम गायकवाड असं आहे. ते मराठा समाजाचे राज्य समन्वयक आहेत. राम गायकवाड यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी उपरोधिकपणे यमाचं रुप धारण केलं. ते थेट रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल करायला आले. त्यांचा यामागचा काय उद्देश होता? ते जाणून घेतलं तर त्यांच्याबद्दलचा आदर कदाचित वाढू शकतो. त्यांनी आपण या अशा प्रकारचा पोषाक परिधान करुन का आलो? याचं खूप सुंदर असं उत्तर दिलं. पण तरीही माढ्याची जनता त्यांना कितपत मतदान करते? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या स्पर्धेत महायुती आणि महाविकास आघाडीचे मातब्बर उमेदवार आहेत.

नक्की वाचा: रामभक्तांच्या अलोट गर्दीने संगमनेरकर भारावले

राम गायकवाड म्हणाले (Corruption)

“ या देशामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकीय पुढाऱ्यांची मग्रुरशाही, हे देवाधिकांना घाबरत नाहीत. ही सगळी लोकं आता फक्त यमाला घाबरणार म्हणून आम्ही यमाच्या अवतारात आलो आहोत. यम हा शेवटचा टोक असतो. या यमाच्या शेवटच्या टोकावर आम्ही इथे आलो आहोत. आम्ही आज लोकसभेत यमाला घेऊन जाणार आहोत. भ्रष्टाचारी लोकांना संपविण्यासाठीच आम्ही यम म्हणून आलेलो आहोत.”

Corruption
Corruption

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here