नगर : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) गेल्या काही दिवसांपासून पंचक (Panchak) या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या तिने या मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी माधुरीने पतीसह आज मुंबईत (Mumbai) सिद्धिविनायकाचे (Siddhivinayak) दर्शन घेतलं आहे. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यावेळी माधुरीसोबत डॉ. श्रीराम नेने, मुलगा अरीन, रायन, वडील माधव नेने, आई अनू नेने हे देखील उपस्थित होते.
नक्की वाचा : खुशखबर ! शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा १६ वा हफ्ता
माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने गेमाधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसह ठिकठिकाणी मुलाखत देताना दिसत आहे. आज माधुरीने पतीसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांच दर्शन व शुभाशीर्वाद घेतले. यावेळी यावेळी माधुरीच्या चाहत्यांनी मंदिराबाहेर एकच गर्दी केली होती.
हेही पहा : अभिनेत्री माधुरी दीक्षित सिद्धिविनायकाच्या चरणी
घरात ‘पंचक’ लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्या परीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचे प्रयत्न सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे माधुरीच्या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
‘पंचक’ या चित्रपटात नव्या-जुन्या ताकदीच्या कलाकारांची फौज आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, सागर तळाशीकर, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर अशी तगडी कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी सांभाळली आहे. तर हा चित्रपट ५ जाानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे