PM Kisan Yojana : खुशखबर ! शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा १६ वा हफ्ता

PM Kisan Yojan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आहे. ही योजना केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी २००० रुपयांचे हप्ते दिले जातात.

0
PM Kisan Samman Nidhi 16th Installment

PM Kisan Yojana: नगर : २०२४ या नव्या वर्षात (New Year 2024) केंद्र सरकारकडून (Central Governmant) शेतकऱ्यांना (Farmers) खास भेट मिळणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) १६ वा हफ्ता जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) १५ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. तेव्हापासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या १६व्या हफ्त्याची (16th Installment) प्रतीक्षा होती. ती आता संपणार आहे.

नक्की वाचा : शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आहे. ही योजना केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी २००० रुपयांचे हप्ते दिले जातात. या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक एकूण ६०००रुपयांची आर्थिक मदत मिळते. आता नवीन वर्षात  शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र, हप्त्याच्या तारखेबाबत अजून  कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६वा हप्ता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो.

अवश्य वाचा : भेंड्यात तहसील कार्यालयाचीच काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत १५ हफ्त्यांचे पैसे मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी १५ वा हप्ता जारी करून ८ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला होता. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here