Bhenda: भेंड्यात तहसील कार्यालयाचीच काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Bhenda : भेंडा येथे सोमवार (ता.१) सकाळी १० वाजता नेवासा - शेवगांव राज्यमार्गावरील चौकात जीवन ज्योत फाऊंडेशनने तहसिल कार्यालयात प्रतिकात्मक अंत्ययाञा काढून निषेध केला आहे. 

0
भेंड्यात तहसील कार्यालयाचीच काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

नेवासा : तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे (Farmers) कपाशी,तूर,बाजरी,मका व फळबाग पिकांचे सन २०२२ मध्ये मोठे नुकसान (Damage to crops) झाले आहे. महसूल विभागाने (Department of Revenue) केवळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे भेंडा (Bhenda) येथे सोमवार (ता.१) सकाळी १० वाजता नेवासा – शेवगांव राज्यमार्गावरील चौकात जीवन ज्योत फाऊंडेशनने तहसिल कार्यालयात (Tehsil Office) प्रतिकात्मक अंत्ययाञा (Funeral) काढून निषेध केला आहे. 

नक्की वाचा : अहमदगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी रंगणार आठ शहरांत

सन २०२२ यावर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करण्यात आलेले होते. वेळेवर पाऊस पडत नसल्यामुळे आधीच बळीराजा खचून गेल्याने त्याची अर्थिक घडी विस्कटलेली आहे.  शेतकरी वर्गावर शासनाने कृपा दाखवत अतिवृष्टीने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केलेले होते. अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकांची भरपाई मंजूर होऊन यादीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावेही आलेली आहेत. मात्र,ही नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरलेली आहे. शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई नेमकी मिळणार तरी कधी ? असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. 

अवश्य वाचा : शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी, यासाठी तहसील कार्यालयात जीवन ज्योत फाऊंडेशनच्या वतीने यापुर्वी अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे जीवन ज्योत फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी सकाळी १० वाजता चक्क तहसील कार्यालयाचीच प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की,आता शेतकरी विरुद्ध महसूल विभाग असे युद्ध आता सुरू झालेले आहे.जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर जमा झाली नाही तर तहसील कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जीवन ज्योत फाऊंडेशनचे अध्यक्ष कमलेश नवले,छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर, सत्यमेव जयते प्रतिष्ठानचे जैद शेख,अक्षय बोधक, आप्पासाहेब आरगडे,ओम आरगडे,सुधीर आरगडे,गणेश चौघुले,अमोल जोगदंड, महेश नवले,तोफीक शेख,विजय खरात,प्रदिप आरगडे,रोहित रुईकर, बन्सी भिगारे,निलेश कडू यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here