Manoj Jarange : मुंबईच्या आंदाेलनात ३ कोटींपेक्षा कमी मराठे आले, तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा 

Manoj Jarange : मुंबईच्या आंदाेलनात ३ कोटींपेक्षा कमी मराठे आले, तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

0
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil


Manoj Jarange Patil : नगर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. मुंबईच्या (Mumbai) आंदोलनात ३ कोटींपेक्षा कमी मराठे मुंबईत आले, तर माझे नाव बदलून ठेवा, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे २६ तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. 

नक्की वाचा: मंदिर चोरी व घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद

येत्या १५ तारखेला आंदाेलनाची दिशा (Manoj Jarange)

जरांगे म्हणाले, ” उपमुख्यमंत्री आजित पवार मराठा आंदाेलकांवर कारवाईची भाषा करत आहेत. त्यांनी आमच्या आंदाेलनाकांवर कारवाई करूनच दाखवावी. आम्ही आमच्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मुंबईला येत आहाेत. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही. मला मरण आले तरी चालेल, पण मराठ्यांना न्याय देऊनच मरेल. त्यामुळे सरकारने भानावर यावं. मुंबईच्या आंदाेलनासाठी आम्ही सज्ज आहाेत. येत्या १५ तारखेला पत्रकार परिषद घेऊन आंदाेलनाची दिशा जाहीर करणार आहे.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणावर अजय महाराज बारस्करांनी सांगितला तोडगा

मनाेज जरांगे आंदाेलनावर ठाम (Manoj Jarange)

दरम्यान, मराठा आंदाेलक मनाेज जरांगे मुंबईच्या आंदाेलनावर ठाम आहे. मुंबईत १४४ कलम जारी करण्यात आले आहे. तरी मुंबईत जाणारच आहे. त्यामुळेच आपण २० जानेवारीला माेर्चाचे नियाेजन केले आहे. मात्र, आता सरकारने १४४ कलमाला मुदतवाढ दिल्यामुळे जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here