Dr. Babasaheb Ambedkar : नगरमध्ये होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

Dr. Babasaheb Ambedkar : नगर : नगर शहरातील मार्केट यार्ड समोरील चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे.

0
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar : नगर : नगर शहरातील मार्केट यार्ड समोरील चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांच्या हस्ते शनिवारी (ता. २०) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या त्यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती पुतळा कृती समितीचे नेते अशोक गायकवाड व आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणावर अजय महाराज बारस्करांनी सांगितला तोडगा

पूर्णाकृती पुतळा (Dr. Babasaheb Ambedkar)

अशोक गायकवाड यांनी सांगितले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगर शहरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. चळवळीतील कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे हे यश आहे. पुतळ्याच्या जागेवर अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. ही जागा रिकामी करून तेथे पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने व नगर महापालिकेच्या सहकार्याने या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. यावेळी भीमगीतांच्या जलशाचे आयोजनही करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा: मंदिर चोरी व घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद

शहराच्या वैभवात भर (Dr. Babasaheb Ambedkar)

आमदार जगताप म्हणाले, हा दिमाखदार पुतळा शहराच्या वैभवात भर पाडेल. शहराला नवी दिशा देणारा हा पुतळा ठरेल. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलेे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here