Terrorist : नगरच्या रेल्वे स्थानकात अतिरेकी घुसले.. पोलिसांनी पकडले; पण…

Terrorist : नगरच्या रेल्वे स्थानकात अतिरेकी घुसले.. पोलिसांनी पकडले; पण…

0
Railway station
Railway station

Police : नगर : नगरच्या रेल्वे स्थानकात अतिरेकी (Terrorist) घुसल्याचा फाेन पाेलीस अधीक्षक (Superintendent of Police) कार्यालयात खणखणला. आणि तत्काळ पाेलीस (Police) यंत्रणा सतर्क झाली, अशातच पोलिसांसह बंदूकधारी स्पेशल कमांडोंचा ताफा रेल्वे स्थानकात (Railway station) घुसला अन् सार्‍यांचीच तारांबळ उडाली. रेल्वे स्थानकावर अतिरेकी घुसल्याची वार्ता सर्वत्र परसली. पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत तातडीने अतिरेकी जेरबंद केले. प्रत्यक्षात पोलिसांचे हे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) असल्याचे समजल्यावर सार्‍यांनीच सुटकेचा श्वास सोडला.

यंत्रणेची धावपळ (Terrorist)

नक्की वाचा: मंदिर चोरी व घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद

तत्काळ कारवाई (Terrorist)

आज दुपारच्या बाराच्या सुमारास रेल्वे अतिरेकी घुसल्याच्या कॉल पोलिसांना आला अन् यंत्रणेची धावपळ उडाली. अवघ्या काही वेळातच शिघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, भिंगार पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यावर या पथकांनी तत्काळ कारवाई करत अतिरेक्यांना ताब्यात घेतले. पाेलिसांची संपर्क केला असता, हे प्रात्यक्षिक असल्याचे समाेर आले.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणावर अजय महाराज बारस्करांनी सांगितला तोडगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here