Manushi Chhillar : मानुषी छिल्लर दिसणार ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात 

Manushi Chhillar : अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आता पुन्हा अक्षय सोबत "बडे मिया छोटे मियाँ " या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

0
Manushi Chillar
Manushi Chillar

Manushi Chhillar : नगर : सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी मिस वर्ल्ड (Miss World) मानुषी छिल्लर आता पुन्हा अक्षय सोबत एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ असलेल्या “बडे मिया छोटे मियाँ “(Bade Miyan Chote Miyan) हा चित्रपट या वर्षीच्या एप्रिलमध्ये ईदला प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. आता या चित्रपटात मानुषी छिल्लर सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उद्या २४ जानेवारीला या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार आहे.

नक्की वाचा : मनोज जरांगेंचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर येणार   

“बडे मियाँ छोटे मियाँत झळकणार मानुषी छिल्लर (Manushi Chhillar)

मागील वर्षी मानुषी या चित्रपटामध्ये दिसणार असल्याच्या फक्त चर्चा होत्या. आता मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मानुषी छिल्लर सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या ती सगळ्या कलाकारांसह जॉर्डनमध्ये शूट करत असून २ फेब्रुवारीपर्यंत तीन गाण्याच्या शूट साठी चित्रपटाची सगळी टीम काम करत असल्याची माहिती आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात ती नेमकी काय भूमिका साकारणार हे निर्मात्यांनी अजून सांगितलेलं नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात हॅकरची भूमिका करणार असल्याचं समजलं आहे.  हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अवश्य वाचा : रामदास आठवलेंचा नगर दाैऱ्याआधी आरपीआय गटात घमासान

मानुषी छिल्लर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त (Manushi Chhillar)

“बडे मियाँ छोटे मियाँ ” मध्ये अक्षय कुमारसोबत तिचं काम हे तिच्या कामाची अनोखी बाजू दाखवणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे शूटिंग यूएई आणि युरोपमध्ये करण्यात येत आहे.  मानुषी १६ फेब्रुवारी रोजी रिलीज होणाऱ्या तेलगू स्टार वरुण तेज सोबत तिचा द्विभाषिक चित्रपट “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” मध्ये सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here