Maratha community : मोर्चासाठी अकोलेतून मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना

Maratha community : मोर्चासाठी अकोलेतून मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना

0
Maratha community
Maratha community

Maratha community : अकोले : मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलन करीत आहेत. सरकारला दोनवेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मुंबईत उपोषण करण्यासाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. २०) हजारो मराठा समाजबांधव (Maratha community) अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले आहेत. यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून बांधव येत असताना अकोलेतूनही बुधवारी (ता. २४) मराठा बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

हे देखील वाचा : नगर-कल्याण रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी (Maratha community)

Manoj Jarange Patil


मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आज पाचवा दिवस आहे. नगरमध्ये मुक्काम केल्यानंतर ते पुणे येथे पोहोचले आहे. तेथून ते नवी मुंबईला जाणार आहे. या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी झालेले आहे. याला बळ देण्यासाठी अकोलेतूनही मराठा बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहे. बुधवारी सकाळी शहरातून मिरवणूक काढत आरक्षण मिळालचं असा जयघोष करुन मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

नक्की वाचा: आता माघार नाही, आरक्षण घेऊनच मागे परतणार : मनोज जरांगे पाटील

मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित (Maratha community)


या मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेक बांधव खासगी वाहनांनी देखील गेले आहे. दरम्यान, आंदोलकांना अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांसह मुस्लीम बांधवांनी शुभेच्छा देत मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी डॉ. संदीप कडलग, महेश नवले, भानुदास तिकांडे आदिंसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : रामदास आठवलेंचा नगर दाैऱ्याआधी आरपीआय गटात घमासान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here