Shivrayancha Chhava:’शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा नवा टीझर आऊट; एकदा पहाच !

Shivrayancha Chhava : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'शिवरायांचा छावा' या सिनेमाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. नुकताच या सिनेमाचा नवा टीझर आऊट झाला आहे.

0
Shivrayancha Chhava
Shivrayancha Chhava

नगर : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या सिनेमाची प्रेक्षक गेल्या  अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. नुकताच या सिनेमाचा नवा टीझर आऊट (Teaser Out) झाला आहे. या टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

‘शिवरायांचा छावा’च्या टीझरमध्ये नेमके काय ? (Shivrayancha Chhava)

 ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये शिवराय शंभूबाळाला सिंहासनाचं महत्व सांगताना दिसत आहेत. टीझरमध्ये शिवराय शंभूबाळाला विचारत आहेत,”शंभूबाळ सिंहासन कसं वाटतंय? या सिंहासनावर तुमच्याआधी रयतेचा अधिकार आहे”. या टीझरमधून शंभूराजांच्या पराक्रमाची कहाणी पुढे उलगडत आहे”. या लक्षवेधी टीझरनंतर प्रेक्षकांना सिनेमाची प्रतीक्षा आहे.

नक्की वाचा : ‘बडे मिया छोटे मिया’चा जबरदस्त टीझर आऊट ; अक्षय व टायगर अ‍ॅक्शनमोडमध्ये  

दिग्पाल लांजेकरांनी केले ‘शिवरायांचा छावा’चे दिग्दर्शन (Shivrayancha Chhava)

दिग्पाल लांजेकरांनी ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. टीझर शेअर करत दिग्पाल लांजेकरांनी लिहिलं आहे,”जयांच्या ध्वनीने उसळती सह्याद्री आणि समुद्र रायगडी बैसले सिंहासनी गर्जती रुद्र. ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात”. दिग्पाल लांजेकरांनी शेअर केलेल्या ‘शिवरायांचा छावा’च्या टीझरवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

अवश्य वाचा : तलाठी भरती २०२३ ची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर  

छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा भव्य आणि उत्साहात साजरा करण्यात आला होता. हाच स्वराज्याचा दुसरा राज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा अनुभवायचा असेल तर ‘शिवरायांचा छावा’ या मराठीतल्या पहिल्या भव्य चित्रपटातील राज्याभिषेकावरील प्रदर्शित झालेल्या गीतातून याची झलक पाहायला मिळेल. येत्या १६ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here