Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुंबई पदयात्रेच्या नियोजनासाठी पारनेरमध्ये बैठक 

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेच्या नियोजनासाठी मराठा समाजाच्या समनवयकांनी पारनेर व सुपा येथे गुरुवारी (ता.४) सायंकाळी नियोजन बैठका घेतल्यात. 

0
Maratha Reservation

Maratha Reservation : पारनेर : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेच्या (Mumbai Walk) नियोजनासाठी मराठा समाजाच्या समन्वयकांनी पारनेर (Parner)सुपा (Supa) येथे गुरुवारी (ता.४) सायंकाळी नियोजन बैठका (Planning Meetings) घेतल्यात. 

नक्की वाचा : दूध उत्पादकांना दिलासा; दुधासाठी सरकार देणार ५ रुपयांचं अनुदान

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज २० जानेवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथुन पदयात्रेने मुंबईला जाणार आहे. या पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा अंतरवली सराटी, शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली,  शिवाजी नगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा,पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे. 

अवश्य वाचा : मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याची मनसेची मागणी  

मराठा मोर्चा नगर जिल्ह्यातून जात असल्याने सुपा परिसरात या मोर्चाचा मुक्काम व मोर्चेकऱ्यांच्या अन्न, पाणी, निवास सोयीसाठी पारनेर व सुपा येथे नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी नियोजनाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यात महिला पुरुष यांची वेगवेगळी व चार ते सहा ठिकाणी व्यवस्था करणे, रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे टँकर उभे करणे,जेवणाची पाकीटे भरुन ती विभागुन वाटप करणे, रहाण्यासाठी मोकळे प्लाॅट साफ करून ठेवणे,जास्तीत जास्त स्वयंसेवक महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त करणे, मोर्चात महिला मोर्चेकरी असल्याने आपल्या परिसरातील महीला स्वयंसेवक तयार ठेवने, तसेच पारनेर तालुका हद्दीत श्रीगोंदा, संगमनेर,अकोले आदी तालुक्यातील मराठा बांधव जमा होतील हा हिशेब धरुन नियोजन करणे, मोर्चाचे स्वागत करणे आदी गोष्टींसह मोर्चा शिरुर पुणे जिल्ह्यातील हद्दीत सुरक्षित पोहच होईल आदी गोष्टींचे नियोजन बैठकीत करण्यात आले.

१० जानेवारीच्या सराटीतील बैठकीत मोर्चाचे मुक्काम वेळापत्रक आल्यावर पुढील नियोजनासाठी बारिकसारीक गोष्टीवर नियोजन करण्याचे चर्चेत ठरले आहे. या बैठकीला नगर येथील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पारनेर सकल मराठा समाजाचे अनेक मान्यवर, पदाधिकारी, पत्रकार यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here